मोदींना बांगड्यांची भेटदेवून मालेगावमधील महिलांनी केला अत्‍याचाराचा निषेध

ADV

मालेगाव – पोलीसनामा ऑनलाईन

उन्नाव, कठुअा, सुरत येथील अत्याचाराच्या घटनांमुळे देशभर संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या घटनांच्या निषेधासाठी ठिकठिकाणी मोर्चे, बंद ,आंदोलने सुरु आहेत.

ADV

मालेगावमधील संविधान बचाव कमिटीच्या महिला सदस्यांनी किदवाई राेडवरील शहिदाें की यादगार स्मारकाजवळ अांदाेलन केले. चाैकात मध्यभागी काचेची पेटी ठेवण्यात अाली हाेती. रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिलांसह कमिटी महिला सदस्यांनी या पेटीत बांगड्या टाकून सरकारवर नाराजी व्यक्त केली. “बेटी बचाअाे’, “नारी सन्मान’च्या घाेषणा देणारे भाजप सरकार महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरले अाहे. सत्तेच्या नशेत संविधान पायदळी तुडवले जात असल्याचा अाराेप करत संविधान बचाव कमिटीने पंतप्रधानांना बांगड्यांची भेट पाठवून अत्याचाराच्या घटनांचा निषेध केला.