BJP आमदाराच्या लोकांनीच घडवून आणला हा ‘अपघात’, उन्नाव ‘रेप’ केसमधील पीडितेच्या बहिणीचा आरोप

उन्नाव : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ येथील सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या कारचा आज रायबरेलीजवळ अपघात झाला. या अपघातामध्ये पीडित मुलीच्या काकूचा आणि वकीलाचा जागीच मृत्यू झाला. तर पीडित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर लखनऊ येथील ट्रॉमा सेंटर येथे उपचार सुरु आहे. हा अपघात आमदार कुलदीप सेंगर याच्या लोकांनीच घडवून आणला असल्याचा आरोप पीडित तरुणीच्या बहिणीने केला आहे.

रायबरेली जेलमध्ये असलेल्या काकांना भेटण्यासाठी पीडित तरुणी कारमधून जात होती. त्यावेळी तिच्या कारला अतरुआ गावाजवळ एका ट्रकने धडक दिली. घटनेच्या तपासासाठी लखनऊचे पोलीस महानिरीक्षक आणि फॉरेन्सिकचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी ट्रक चालक आणि ट्रक मालकाला ताब्यात घेतले आहे.

या घटनेचा तपास फॉरेन्सिकचे पथक स्थानिक पोलिसांसोबत काम करणार असल्याचे पोलीस महानिक्षकांनी सांगितले. अपघात झाला त्यावेळी गाडीमध्ये जागा नसल्याने सुरक्षा कर्मचारी गाडीत नसल्याचे पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त आणि समाजवादी पक्षाचे उदयवीर आणि सुनील साजन हे पीडित तरुणीला भेटण्यासाठी ट्रॉमा सेंटर येथे पोहचले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त