दहा वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- मोटार सायकल शिकवण्याचा बहाणा करुन गायरान भागात नेऊन दहा वर्षांच्या मुलावर एकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणाच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी आठच्या सुमारास घडला.

नवनाथ दत्तू चव्हाण (२५, रा. कातवी) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित दहा वर्षाच्या मुलाला मोटार सायकल शिकवण्याचा बहाणा करुन रंकाळा नावाच्या गायरान परिसरात नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या घरच्याना मारुन टाकीन अशी धमकी दिली.

मात्र पीडित मुलाला त्रास सहन न झाल्याने त्याने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर नवनाथ याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.