Unseasonal Rains In Pune | काय सांगता ! होय, पुणे शहरात गारांचा पाऊस, हवामानशास्त्र विभागानं केला ‘यलो अलर्ट’ जारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Unseasonal Rains In Pune | शहरात अलिकडील काळात दुपारच्या वेळी चांगलच उन जाणवतं. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) आज (दि. 15) सायंकाळी पुणे शहरात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. दुपारी साडेतीन-पावणे चार वाजण्याच्या सुमारास काही ठिकाणी गारायुक्त पावसाला सुरूवात झाली होती. पुणेकरांनी सतर्क राहावे असा इशाराच देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहर, जिल्हयासह राज्यातील तापमानाचा पारा वाढला आहे आणि त्यानंतर ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. (Unseasonal Rains In Pune)

केरळ ते छत्तीसगड दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून सध्या आकाशात मोठे ढग तयार होण्यासाठी सुरूवात झाली आहे. काही मोठे ढग हे पुणे शहर आणि जिल्हयात येत आहेत. त्यामुळेच हवामान विभागानं पुणे शहर आणि जिल्हयात यलो अलर्ट जारी केला आहे. वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहराच्या लगतच्या भागात दुपारी 4 नंतर पावसाला सुरूवात होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Unseasonal Rains In Pune)

पुणेकरांनी ढगांच्या गडगडाटावेळी वृक्षाखाली आसरा घेऊ नये, पाऊस पडल्याने रस्त्यावर वाहने घसरतात
त्यामुळे चालकांनी वाहने सावकाश चालवावीत. वीजांचा कडकडाट सुरू असताना मोबाईलचा वापर करू नये आदी सुचना हवामान विभागानं दिल्या आहेत.

Web Title :- Unseasonal Rains In Pune | heavy rain in pune city and district yellow alert issued by meteorological department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Borghat Accident News | बोरघाटात बस दरीत कोसळली ! खोपोलीतील घटनेत 8 जणांचा मृत्यु, 32 जण जखमी

Radhakrishna Vikhe-Patil | ‘आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये’, विखे-पाटलांच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

Pune Crime News | २४ वर्षाच्या मुलावर लादली अवास्तव बंधने; आईवडिलांना सांगण्याच्या धमकीने लुबाडले अडीच लाख