Video : तोपर्यंत मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. यानंतर एकच राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात भाजपाने उडी घेतली असून भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमस्या यांनी मुंडे यांना जोपर्यंत आरोपातून मुक्त होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

आरोप झाल्यानंतर मुंडे यांनी आपण 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली, असा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात गदारोळ सुरु झाला आहे. 3 महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावे याबाबतचा व्हिडीओ किरीट सोमय्या यांनी ट्वीट केला आहे.

तसेच त्या व्हिडीओमधून किरीट सोमय्या यांनी मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्राच्या अस्मिता, संस्कृतीला धक्का पोहचला असून जोपर्यंत धनंजय मुंडे यांची आरोपातून मुक्तता होत नाही, तोपर्यंत त्यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार त्यांना नाही, असे म्हटले आहे.