भीषण अपघात : यमुना एक्सप्रेसवर बस नाल्यात कोसळून ३० ठार

लखनौ : वृत्तसंस्था – लखनौ – आग्रा महामार्गावर एक बस पुलावरुन नाल्यात कोसळून त्यात ३० जण ठार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

यमुना एक्सप्रेस या सहा लेनच्या हायवेवर हा अपघात झाला असून या बसमधून पोलिसांनी २० जणांना बाहेर काढले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येत आहे.

ही बस लखनौहून दिल्लीकडे जात होती. बसमध्ये ५० जण होते. स्लिपर कोच असलेली ही बस आग्र्याजवळ आली असताना एका ठिकाणी थांबली होती. त्यावेळी बसचालक काही वेळ झोपला होता. त्यानंतर त्याने बस पुन्हा सुरु केली व ते दिल्लीकडे जाऊ लागले. एका पुलावरुन जाताना बसचालकाला डुलकी लागली. बस वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस पुलावरुन १५ फुट खोल जाऊन नाल्यात पडली. या अपघातात किमान ३० जण ठार झाले असून पोलिसांनी बसमधून २० जणांना बाहेर काढले.

उत्तर प्रदेश सरकारने अपघातात ठार झालेल्या लोकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार

या पाच गोष्टींचा ‘आहारा’ त करा वापर, शरीर होईल निरोगी

पश्चिम उपनगरातील रेल्वे प्रवाशांसाठी आता ‘रेल्वे आरोग्य कार्ड’