धक्‍कादायक ! गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB Live करत केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या केलेले आपण पाहिले असतील. आग्राच्या रैभा गावात असाच काहीसा प्रकार घडला आहे. रैभा गावातील एका प्रियकराने प्रियसीचा साखरपुडा दुसऱ्या मुलासोबत होत असल्याने एका मंदिरात आत्महत्या केली आहे. हा मुलगा २२ वर्षांचा असून त्याचे नाव श्याम शिकरवार असं आहे.

आपल्या प्रियसीचा साखरपुडा दुसऱ्या कोणामुलासोबत होत असल्याने त्याला ते सहन झाले नाही. त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. हा मुलगा एका मंदिरात गेला. तेथून त्याने आत्महत्येपूर्वी फेसबुक लाईव्ह केले होते. तसंच त्याने ४ पानांचे आत्महत्या पत्र लिहीले आहे. ज्यात त्याने आपण आत्महत्या करत असल्याने आपल्या कुटुंबाची माफी मागितली आहे. तसंच मेल्यानंतर आपले शरीर दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह केले होते. त्यावेळी त्याने आपण आत्महत्या करत असल्याचेही सांगितले होते. त्या हा लाईव्ह व्हीडिओ त्याच्या मित्रपरिवाराने आणि कुटुंबातील लोकांनी पाहिला होता. हा व्हीडिओ चार मिनिटांचा असून त्यात त्याने आपल्या आत्महत्येचे कोणालाही जबाबदार न धरता कोणाविरोधात कारवाई करू नये अशी विनंती केली आहे. तसंच आपल्या मृतदेहाचे फोटो काढून ते फेसबुकवर टाकण्याचीही त्याने विनंती केली आहे. तसंच ४ पानांच्या पत्रात, माला तिची आठवण येते. तिच्याशिवाय मी नाही राहू शकत. तिचे लग्न दुसऱ्या कोणाशी होतेय हे मला सहन होत नाही. तीच्या जाण्याच्या दुखात माझी नोकरीही गेली आहे, असं म्हटलं आहे.

दरम्यान, पोलीसांनी सांगितल्यानुसार, तेथील स्थानिक लोकांनी त्याचा मृतदेह मंदिराच्या परिसरात लटकलेले पाहिले होते. त्यानंतर तपासात तो मुलगा बेरोजगार असून दुखी असल्याचे समोर आले. आम्ही शवविच्छेदन केल्या नंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबाच्या हवाली केला आहे. तसंच आता त्या मुलाचे फेसबुक अकाऊंटही डिलीट करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like