‘त्या’ वक्तव्यानंतर नसीरुद्दीन शहांचे पाकिस्तान तिकीट बुक : १४ ऑगस्टपर्यंत देश सोडण्याची धमकी

वृत्तसंस्था : उद्या हे लोक माझ्या मुलांना अडवून जात विचारतील अशी भीती जेष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली होती. तसेच या देशात गायीचा जीव पोलीस अधिकाऱ्यापेक्षा महत्वाचा झालाय. अशी सनसनाटी विधाने शहा यांनी केली होती. त्यानंतर त्यांना बऱ्याच टीकांचा सामना करावा लागतो आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावरून उत्तर प्रदेश येथील शिवसेनेच्या नेत्याने अभिनेते नसीरुद्दीन शहा यांना देश सोडून पाकिस्तानात जाण्यास सांगितले आहे. या पक्षाने नसीरुद्दीन यांचे मुंबई ते कराची व्हाया कोलंबो असे विमानाचे तिकीट देखील बुक केले आहे. त्यांना या पक्षाने १४ ऑगस्टला देश सोडण्याची धमकी दिली आहे. बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी त्यांनी आपले विचार व्यक्त केले होते. त्यावरून शहा यांना भीती वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानला जावे असे या पक्षाने म्हटले आहे.
शहांना म्हंटले देशद्रोही… 
उत्तर प्रदेशातील स्थानिक पक्षाचा अध्यक्ष अमित जानीने नसीरुद्दीन शहा यांना १४ ऑगस्ट पर्यंत देश सोडण्याची धमकी दिली आहे. त्याने शहा यांचे मुंबई ते कोलंबो आणि कोलंबो ते कराची असे हवाई तिकीट देखील बुक केले आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी नसीरुद्दीन शहा यांना देश सोडावा. जेणेकरून या देशातून एका देशद्रोह्याचे भार कमी होईल. असे त्याने धमकावले आहे.
बुलंद शहर हिंसाचार बाबतीत केले होते वक्तव्य 
बुलंदशहरात गो तस्करीच्या संशयात जमावाने हिंसाचार माजला. तसेच बचाव करण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यावर एका मुलाखतीमध्ये बोलताना नसीरुद्दीन शहा म्हणाले होते, की “बुलंदशहर हिंसाचारावरून या देशात पोलिस अधिकाऱ्यातच्या जीवापेक्षा गाय महत्वाची झाल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीला वातावरणात विष कालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला तर या गोष्टीची भीती वाटते, की उद्या हे लोक माझ्या मुलांना अडवून विचारतील की सांग तू हिंदू आहेस की मुसलमान..? या प्रश्नाचे त्यांच्याकडे काहीच उत्तर नसेल.