Upcoming IPL 2021 : राजस्थान रॉयल्स संघाने 17 खेळाडूंना ठेवले कायम, संजू सॅमसन करणार संघाचे नेतृत्व

वृत्तसंस्था :  IPL 2021 : 2021 च्या IPL मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने 17 खेळाडूंना कायम ठेवले आहे. तसेच उर्वरित 8 खेळाडूंना राजस्थान रॉयल्स संघातून बाहेर काढण्यात आले आहे. तर IPL 2020 संघाचे नेतृत्व करणाऱ्या स्टीव स्मिथ वगळून संघाचा कर्णधार म्हणून संजू सॅमसन नेतृत्व करणार असल्याची माहीती राजस्थान रॉयल्स कडून देण्यात आली आहे.