UPI Payment Rule | UPI वापरकर्त्यांनी Payment फेल झाल्यास घाबरण्याची गरज नाही; ‘या’ पध्दतीने तात्काळ मिळेल दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – UPI Payment Rule | युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तुम्ही एखादे पेमेंट (Payment) करतेवेळी ते पेमेंट अयशस्वी झाले अथवा UPI अंतर्गत अडकले तर आता तुम्हाला घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. कारण आता UPI साठी रिअल टाइम पेमेंट डिस्प्युट रिझोल्यूशन सिस्टम (Real Time Payment Dispute Resolution System) तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणतीही अडचण (UPI Payment Rule) निर्माण होणार नाही.

 

UPI हा सर्वात जास्त वापरला जाणारा डिजिटल पेमेंट मोड आहे. मात्र, काहीवेळा UPI वापरकर्ते पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे नाराज होतात. परंतु, आता अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नसणार आहे. अडचणीपासून दूर करण्यासाठी आता रिअल टाइम पेमेंट डिस्प्युट रिझोल्यूशन सिस्टम हा पर्याय येत आहे.

दरम्यान, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payment Corporation of India) अथवा NPCI UPI साठी
रिअल टाइम पेमेंट डिस्प्युट रिझोल्यूशन सिस्टम तयार करत आहे. यानंतर यूजर्सची या समस्येपासून सुटका होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
त्याचबरोबर एनपीसीआयचे एमडी आणि सीईओ दिलीप आसबे (Dilip Asbe) यांनी सांगितले की ही प्रणाली सप्टेंबर 2022 पर्यंत कार्यान्वित होईल.
अॅपमधील वैशिष्ट्यासह जवळपास 80-90 टक्के पेमेंट फेल रिअल टाइममध्ये सोडवले जाण्याची अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे.
अशी माहिती एका वृत्तानुसार समोर आली आहे.

 

Web Title :- UPI Payment Rule | upi users immediate relief if payment fails upi payment rule update

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा