UPSC Exam 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून IAS, IFS पदांसाठी पूर्व परीक्षांच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून गुरुवारी आयएएस आणि आयएफएस २०२१ साठी पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. या तारखांनुसार आयएएस/आयएफएसची पूर्व परीक्षा २७ जून २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. यासंदर्भात आयोगाने अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी उमेदवाराला ४ मार्च २०२१ ते २४ मार्च २०२१ या कालावधीत अर्ज करता येणार आहे. आयएएसच्या ७१२ आणि आयएफएसच्या ११० जागांसाठी हि परीक्षा घेण्यात येणार आहे.

महत्वाच्या तारखा

आयएएस आणि आयपीएस या पदांसाठी ४ मार्च २०२१ ते २४ मार्च २०२१ या कालावधीत अर्ज करता येणार आहे. तसेच सर्व उमेदवारांनी २४ मार्च २०२१ पर्यंत अर्ज फी जमा करावी लागणार आहे. या परीक्षांचे प्रवेशपत्र जूनमध्ये देण्यात येणार आहे. या पदांची पूर्व परीक्षा २७ जून २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

आयएएस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी घेतलेली.

आयएफएस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञान, वनस्पतिशास्त्र, कृषी, भूविज्ञान, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी किंवा संबंधित व्यापार विषयात पदवी घेतलेली असावी.

अर्ज फी आणि वयोमर्यादा

या पदांवर अर्ज करणारे सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना १०० अर्ज फी जमा करावी लागणार आहे तर एससी/एसटी/दिव्यांग आणि महिलांसाठी कोणतीही फी लागणार नाही.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३२ वर्षे असले पाहिजे. तसेच नियमांनुसार उमेदवारांना आरक्षणानुसार वयाची सवलत देण्यात येणार आहे.

अर्ज कसा करावा

उमेदवार यूपीएससीच्या https://www.upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच या वेबसाईटवर उमेदवाराला फॉर्म भरण्याशी संबंधित संपूर्ण माहिती आणि या भरतीची अधिसूचना मिळेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना नीट पूर्णपणे वाचावी. जर अर्ज केल्यानंतर त्यामध्ये काही चूक आढळल्यास तो अर्ज बाद केला जाईल.