‘उरी’ फेम विकी कौशलसह, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला देखील कोरोनाची लागण; सध्या होम क्वारंटाईन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या प्रकरणांत पुन्हा एकदा वाढ होत आहे. कोरोनाच्या नवीन संक्रमितांचा आकडा हजारोने वाढत आहे. या जीवघेण्या विषाणूने आता क्रिकेट विश्वपाठोपाठ मनोरंजन क्षेत्रालाही कचाट्यात अडकवलं आहे. काल अभिनेता अक्षय कुमार आणि गोविंदानंतर आता उरी फेम विकी कौशलला देखील कोरोनाची लागन झाली आहे. विकी कौशल सध्या होम क्वारंटाईन असल्याचे समजते.

अभिनेता विकी कौशलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अभिनेत्यानं स्वतः याबाबत माहिती दिली. त्याने म्हंटले कि, माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असं आवाहन यावेळी विकीनं यावेळी केलं. दरम्यान, विकी सोबतच प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. भूमीने देखील स्वत:ला होम क्वारंटाइन केल्याची माहिती मिळाली आहे.

दुसरीकडे , काल अभिनेता अक्षय कुमारचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, मात्र त्याची तब्येत थोडी बिघडल्यानंतर त्याला आज सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीजना कोरोनाची लागण झाली आहे. यात अक्षय कुमार, गोविंदा, आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, सतीश कौशिक, टीव्ही इंडस्ट्रीच्या स्टार रुपाली गांगुली, सुधांशू पांडे, राजन शाही, अमर उपाध्याय यांचा समावेश आहे.