Uric Acid | यूरिक अ‍ॅसिडचे रूग्ण डाळ खाणे टाळतात, परंतु ‘या’ डाळीमुळे होणार नाही नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जेव्हा किडनी यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid) फिल्टर करू शकत नाही, तेव्हा ते शरीरात रक्तामध्ये जमा होऊ लागते. नंतर त्याचे लहान तुकडे होतात आणि हाडांच्या मध्ये साठून ती कमजोर होतात. या स्थितीला गाउट (Gout) म्हणतात. एवढेच नाही तर शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी (Uric Acid Level) वाढल्यामुळे इतरही अनेक समस्या उद्भवतात (Uric Acid).

 

यामध्ये संधिरोग, सांधेदुखी, रक्तदाब आणि किडनीच्या आजारांचा (Gout, Arthritis, High Blood Pressure And Kidney Disease) समावेश आहे. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायामासोबतच आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

 

हाय यूरिक अ‍ॅसिडच्या (High Uric Acid) समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आहारात कमी प्युरीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यूरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांसाठी मूग डाळीचे सेवन किती फायदेशीर आहे ते जाणून घेऊया (Let’s Know How Beneficial Is The Consumption Of Yellow Lentil For Uric Acid Patients). रोजच्या जेवणात कोणत्या डाळी खाव्यात आणि कोणत्या खाऊ नयेत ते जाणून घेवूयात…

 

मूग डाळ (Yellow Lentil)
युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) असलेल्या रुग्णांना मूग डाळ खाण्याचा सल्ला दिला जातो. ती खूप हलकी आणि निरोगी आहे. याचा वापर सामान्यतः खिचडी किंवा स्प्राऊट बनवण्यासाठी केला जातो. याचे कोणत्याही स्वरूपात सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

या डाळी देखील फायदेशीर (These Pulses Are Also Beneficial)
कडधान्यांमध्ये भरपूर प्रोटीन असतात. मूग व्यतिरिक्त, यूरिक अ‍ॅसिडचे रुग्ण त्यांच्या आहारात तूर डाळीचा समावेश करू शकतात.

 

या डाळी अजिबात खाऊ नका (Do Not Eat These Pulses At All)
युरिक अ‍ॅसिड असलेल्या रुग्णांनी काही कडधान्ये खाणे टाळावे. मसूर डाळ, राजमा, हरभरा आणि चणे यामध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते. या सर्व डाळींचे सेवन केल्याने वेदना आणि सूज येण्याची समस्या वाढू शकते.

 

मटार, मशरूम, वांगी आणि हिरव्या पालेभाज्यांचा (Peas, Mushroom, Brinjal, Green Leafy Vegetables)
आहारात समावेश केल्यास युरिक अ‍ॅसिड नियंत्रित राहण्यास मदत होते.
यासोबतच ओट्स, ब्राऊन राईस आणि बार्ली (Oats, Brown Rice And Barley) खाणेही फायदेशीर ठरू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Uric Acid | uric acid patients moong dal benefits pulses to avoid for high uric patients

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits OF Honey And Nutmeg | जाणून घ्या मध आणि जायफळ एकत्र खाण्याचे अनेक फायदे

 

Benefits OF Honey And Nutmeg | जाणून घ्या मध आणि जायफळ एकत्र खाण्याचे अनेक फायदे

 

Rice Water Benefits For Skin | तांदळाच्या पाण्याचे त्वचेसाठी ‘हे’ 5 फायदे तुम्हाला आश्चर्यचकीत करतील!