Urine Colour And Its Meaning | तुमचा लघवीचा रंग ठरवतो तुमचं आरोग्य, लघवीच्या कलरवरून ओळखू शकता ‘हे’ आजार…

पोलीसनामा ऑनलाईन – निरोगी व्यक्ती दिवसातून सुमारे 7 ते 8 वेळा लघवी करते (Urine Colour And Its Meaning). या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे शरीरातील घाण बाहेर पडते (Body Detoxation) आणि हानिकारक विषारी पदार्थ देखील बाहेर पडतात. अनेक वेळा तुम्ही आजारी पडल्यावर डॉक्टरांनी तुम्हाला पॅथॉलॉजिस्टकडे (Urine Test) जाऊन लघवीचा नमुना देण्यास सांगितले असेल. तुमचा आजार लघवीद्वारे सुद्धा ओळखला जातो. याचा खरं तर, लघवीचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगू शकतो. सामान्यतः लघवीचा रंग पाण्यासारखा किंवा खूप हलका पिवळसर असतो. मात्र याशिवाय लघवाचा दुसरा कोणता रंग असेल तर, ती आपल्या शरीरासाठी धोक्याची घंटा असू शकते (Urine Colour And Its Meaning).

जाणून घेऊया लघवीच्या रंगाचा अर्थ (Meaning Of Urine Colour) –

गडद पिवळा (Dark Yellow Urine) –

जेव्हा तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा होतो, तेव्हा याचा अर्थ असा की शरीर निर्जलीकरण झाले आहे. म्हणजेच तुम्हाला आता जास्त पाणी पिण्याची गरज आहे. त्यामुळे निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. याशिवाय ताज्या फळांचा रस किंवा लिंबू पाणी प्यायल्याने लघवीचा रंग सामान्य होईल.

हलका पिवळा (Light Yellow Urine) –

तुमच्या लघवीचा रंग (Urine Colour) हलका पिवळा असेल, तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या शरीराला आवश्यक तेवढे पाणी पीत नाही. अशा स्थितीत थोडे जास्त पाणी प्यावे त्यामुळे लघवी सामान्य होण्यास मदत होईल. काही वेळा मधुमेह (Diabetes) आणि किडनीच्या आजारामुळे (Kidney Problem) लघवीचा रंग हलका पिवळा होतो (Urine Colour And Its Meaning).

ढगासारखा पांढरा रंग (Cloudy Colour Urine) –

कधीकधी लघवीचा रंग ढगासारखा ढगाळ होतो, हा रंग गंभीर संसर्ग दर्शवतो.
तुम्हाला युरिन इन्फेक्शन (Urine Infection) असू शकतं. अशा वेळी तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे जावे.

हिरवा – तपकिरी रंग (Green – Brown Urine) –

अनेक वेळा रंगीत पदार्थ किंवा अ‍ॅलोपॅथीची (Allopathy) औषधे जास्त प्रमाणात खाल्ल्यास लघवीचा रंग हिरवा-तपकिरी
होऊ शकतो, परंतु तसे नसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.

तपकिरी रंग (Brown Urine) –

जेव्हा पित्ताशयात इंनफेक्शन (Gall Bladder Infection) होत, तेव्हा लघवीचा रंग तपकिरी होतो.
याशिवाय पित्त नलिकेत कोणत्याही प्रकारची जखम (Injures) किंवा अडथळे (Urine Problem) असल्यास सुद्दा
तापकिरी रंगाची लघवी होऊ शकते. अशा वेळी तुम्ही लघवीची तपासणी (Laboratory Urine test) करून घ्यावी.

लाल रंग (Red Urine)-

लघवीचा रंग अनेक कारणांमुळे लाल होऊ शकतो. तसेच बीटरूट किंवा त्याचा रस प्यायल्यास आपली लघवी लाल होणे,
हे अत्त्यंत सादरण आहे. याशिवाय अनेक औषधे किंवा सिरप खाल्ल्यानेही लघवी लाल होऊ शकते.
त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. परंतु अनेकदा लघवीसोबत रक्त येऊ लागते, त्यामुळे तिचा रंग लाल होतो.
कधीकधी लघवीतील लाल रंग मूत्रपिंडाचे आजार, संसर्ग (Viral), कर्करोग (Cancer Disease) किंवा
अंतर्गत रक्तस्त्राव (Internal Bleeding) असू शकतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad On Ajit Pawar | शरद पवारांना संपवण्याची त्यांनी सुपारी घेतलीय, कालपर्यंत दैवत…, आव्हाडांचा अजित पवारांवर थेट आरोप

Pune Crime News | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

Shiv Sena Thackeray Group | शिवसेना ठाकरे गटाचा मोदी सरकारवर निशाणा, ”मतदान आटोपताच दरवाढ… ही मोदी सरकारची हातचलाखी”

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा