Urmila Arjunwadkar | अभिमानास्पद ! जयसिंगपूरची कन्या झाली अमेरिकेत नगरसेविका

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Urmila Arjunwadkar | अमेरिकेतील (America) न्यूजर्सी (New Jersey) भागात पार पडलेल्या नगरपरिषद निवडणूकीत होपवेल टाउनशिपमध्ये नगरसेविका म्हणून महाराष्ट्राची कन्या उर्मिला जनार्दन अर्जुनवाडकर (Urmila Arjunwadkar) यांची निवड झाली आहे. त्यांनी या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार एडवर्ड एम. जॅकोवस्की (Edward M. Jakowski) यांचा एक हजार मताच्या फरकाने विजय मिळवला आहे. होपवेल टाऊनशिपच्या तीनशे वर्षाच्या इतिहासात भारतीय वंशाची पहिलीच नगरसेविका होण्याचा मानसुद्धा उर्मिला (Urmila Arjunwadkar) यांना मिळाला आहे. उर्मिला जनार्दन अर्जुनवाडकर (Urmila Arjunwadkar) ह्या विजया (Vijaya Arjunwadkar) व जनार्दन दामोदर अर्जुनवाडकर (Janardhan Damodar Arjunwadkar) यांच्या कन्या आहेत. त्यांचे शिक्षण जयसिंगपूरमध्ये ‘बी’ वॉर्ड शाळा, जयसिंगपूर हायस्कूल व जयसिंगपूर कॉलेज येथे झाले. तसेच त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून पदवीउत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

 

सध्या त्या अमेरिकेतील न्युजर्सी राज्यांतील होपवेल येथे असून त्या सुप्रसिद्ध औषध निर्मिती कंपनीत गेली 25 वर्षं शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे संशोधन कार्य प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मासिके आणि परिषदांमध्ये प्रसिध्द झाले आहे. त्याला आंतरराष्टीय विज्ञान जगतात मान्यता मिळाली आहे. उर्मिला यांनी न्यूजर्सी येथे महाराष्ट्रीयन व भारतीय संस्कृती, परंपरा व मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी मराठी शाळा व संस्कार वर्गांची सुरुवात केली. तसेच त्यांच्याकडे गणपती उत्सव ही गेली 25 वर्षं मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गर्ल स्काउट्स-लीडर, पालक शिक्षक संघटना पदाधिकारी, होपवेल व्हॅली फूड पॅंट्री आणि ए टू झेड मार्गदर्शन उपक्रम या स्थानिक संस्थानच्या कार्यांत त्यांचा सहभाग असतो. त्याच्या याच कार्यांची दखल घेऊन त्यांची झोनिंग व ऍडजस्टमेंट बोर्डवर सहकारी, सहायक सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली.

गेल्या सहा वर्षांपासून टाउनशिपच्या समस्या आणि प्रशासनाचे काम त्या पाहत आहेत.
त्यामुळे त्यांना टाउनशिपच्या समस्या आणि प्रशासनाचे विस्तृत ज्ञान व सखोल जाण आहे.
यामुळे त्यांना या निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या निवडणूकीत दैदिप्यमान यश मिळवून जयसिंगपुरचा आणि भारताचा अटकेपार झेंडा फडकवला. त्यांना या निवडणूकीत 3701 मते मिळाली. त्यांच्या कामगिरीचे अमेरिकेत विविध स्तरावर कौतुक होत आहे. त्यांचा शपथ विधी कार्यक्रम जानेवारीमध्ये होणार आहे. जयसिंपूरमध्ये असताना देखील उर्मिला (Urmila Arjunwadkar) यांचा विविध क्रीडा व सामाजिक कार्यात सहभाग असायचा. तसेच त्यांनी जयसिंगपूर कॉलेजमध्ये (Jaisingpur College) जयसिंगपूरचे विद्यार्थिनी प्रमुखपदही भूषविले आहे. तसेच कॉलेजमध्ये असताना विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय स्पर्धेत त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या टेबल टेनिस संघात निवड झाली होती व सांघिक सुवर्ण पदकही जिंकले होते.उर्मिला यांच्या यशामध्ये त्यांचे पती अशोक पुरंदरे, मुलगा रोहित व मुलगी राधिका यांचा मोठा वाटा आहे.

 

Web Title :- Urmila Arjunwadkar | urmila arjunwadkar of jaisingpur become hoptown corporator of america states new jersey

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे मनपा निवडणूक ! प्रभाग रचनेसाठी ‘वेटींग’ करणार्‍या काही नगरसेवकांनी ‘विकास कामांच्या’ वर्क ऑर्डर ठेवल्या ‘होल्ड’वर

PM JanDhan Account | ‘या’ पध्दतीनं उघडा पीएम जनधन अकाऊंट, सरकार करते 1.3 लाख रुपयांची मदत; जाणून घ्या

Sharad Pawar | शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले – ‘…तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढू’