इंधनाच्या वाढत्या दरांवरून शिवसैनिक अभिनेत्री उर्मिला यांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाल्या – ‘अक्कड बक्कड बंबे बो, डिझल नव्बे पेट्रोल सौ…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडाल्याने देशभरात संतापाची भावना आहे. अनेक राज्यात पेट्रोलच्या किंमती 100 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. तर स्वयंपाकाच्या गॅसचे दर आभाळाला भिडले आहेत. बॉलीवुड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने या महागाईवरून एक ट्विट केले आहे. तिने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, ’अक्कड बक्कड बंबे बो, डीजल नब्बे पेट्रोल सौ, सौ में लगा धागा, सिलेंडर ऊछल के भागा.’

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत गुरुवारी लागोपाठ 10व्या दिवशी सुद्धा वाढ झाली आहे. मध्य प्रदेशच्या अनूपपुरमध्ये आज एक लीटर पेट्रोलचा दर 100.25 पैसे झाला. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये सुद्धा पेट्रोलचा भाव 100.49 रुपये प्रति लीटरवर पोहचला आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीमध्ये 34 पैशांची वाढ केली, तर डिझेलच्या किंमतीत 32 पैशांची वाढ केली आहे. याशिवाय ब्रँडेड पेट्रोलची किंमत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये 100 रुपये प्रति लीटरच्या पुढे गेली आहे.

मध्य प्रदेशच्या अनूपपुरमध्ये गुरुवारी डिझेलची किंमत सुद्धा 90.35 रुपयांच्या पुढे गेली. राजस्थाननंतर मध्य प्रदेश, पेट्रोलवर सर्वात जास्त वॅट वसूल करते. मध्य प्रदेशात 33 टक्केसह 4.5 रुपये लीटरचा कर आणि पेट्रोलवर एक टक्का उपकर लावला जातो. डिझेलवर कर 23 टक्के आणि तीन रुपये प्रति लीटर तसेच एक टक्का उपकर आहे.

गुरुवारच्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल 89.88 रुपये, आणि डिझेल 80.27 रुपये आहे. अशाच प्रकारे मुंबईत पेट्रोल 96.32 रुपये प्रति लीटर आणि डिझेलची किंमत 87.32 रुपये प्रति लीटर झाली आहे.

किती झाला सिलेंडरचा दर

इंडियन ऑईलनुसार ग्राहकांना 14 किलोग्रॅमच्या नॉन सबसिडी घरगुती गॅस सिलेंडरसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. एलपीजी सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढले आहेत. यासाठी दिल्लीत 719 रुपये प्रति सिलेंडर, कोलकातामध्ये 745.50 रुपये प्रति सिलेंडर, मुंबईत 710 आणि चेन्नईत 735 रुपये प्रति सिलेंडर द्यावे लागतील.