Urvashi Rautela Oops Moment : ‘उप्स मुमेंट’ची शिकार झाली ‘हॉट’ अ‍ॅक्ट्रेस उर्वशी रौतेला ! चालू व्हिडीओत निसटला ड्रेस (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बॉलिवूडमधील हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव असते. गेल्या काही दिवसांपासून तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अटेंशन घेत आहेत. ती कायमच बिकिनीत दिसत असते. अनेकदा आपल्या फॅशनमुळंही उर्वशी चर्चेत असते. उर्वशीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एका जागी बसून काही डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. परंतु यावेळी ती उप्स मुमेंट (Oops Moment) ची शिकार झाली होती. परंतु तिनं लगेचच स्वत:ला सावरलं सुद्धा. सध्या या व्हिडीओची सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

अशा प्रकारे उर्वशीनं हाताळली उप्स मुमेंट

उर्वशीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती एका जागी बसून डान्स करताना मध्येच तिचा ड्रेस नीट करताना दिसते. या व्हिडीओत ती वॉर्डरोब मालफंक्शन (Wardrobe malfunction) वाल्या उप्स मुमेंट (oops moment) ला चागंल्या पद्धतीनं हाताळताना दिसते.

उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. चाहत्यांना तिचा हॉटनेस खूप आवडला आहे. काही लोक असेही आहेत जे तिच्या कॉन्फिडंसचं कौतुक करताना दिसत आहेत.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एका बायोपिक वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. यात ती अभनेता रणदीप हुड्डा सोबत काम करणार आहे. ही थ्रीलर सीरिज पोलीस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारीत असणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात दिसली. याशिवाय तिनं एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत आणि पागलपंती सिनेमातही काम केलं आहे. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 2 या सिनेमात दिसणार आहे. सिंह साहब दी ग्रेट या सिनेमातून तिनं सनी देओलसोबत बॉलिवूड डेब्यू केला होता.