55 लाखांचा लहेंगा घालून फोटोशूट करताना उर्वशी रौतालाचा गेला ‘तोल’

पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहते. आता ती एका व्हिडिओमुळे चर्चेत आली असून तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल (urvashi-rautela-lost-balance-during-photoshoot-jass-manak-video-goes-viral) होत आहे. यात ती प्रसिध्द पंजाबी गायक जस मानकसोबत फोटोशूटसाठी पोज दिताना दिसत आहे. फोटोशूट सुरु करताना अचानक तिचा तोल जातो अन् ती खाली बसते. तिने या व्हिडिओत तब्बल 55 लाखांचा लंहेगा परिधान केला आहे.

तिचा हा व्हिडिओ नेहा कक्करच्या लग्नाच्या वेळेसचा आहे. उर्वशीने हाच 55 लाखांचा लहेंगा घालून नेहा कक्करच्या लग्नात हजेरी लावली होती. उर्वशी मानकसोबत एका आराम खुर्चीवर बसून फोटो काढत होती. तेवढ्यात तिचा लहेंग्यात पाय अडकला अन तोल गेला. 2011मध्ये उर्वशीने मिस टुरीस्ज्म क्विन ऑफ दि इयरचा किताब जिंकला होता. यंदा तिने मिस एशियन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले आहे. सिंह साहब- द ग्रेट या चित्रपटाद्वारे तिने डेब्यु केला होता. यात तिने सनि देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलीवूड रॅपर हनी सिंह याच्या लव डोस या अल्बममध्ये दिसून आली होती.