उर्वशी रौतेलाच्या ‘Blue & Black’ फोटोंनी लावली सोशलवर ‘आग’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार उर्वशी रौतेला सध्या आपल्या फोटोंमुळं सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये उर्वशीचा काळ्या ड्रेसमधील आणि आकाशी रंगाच्या बिकीनीतील काही फोटो आहे. तिचे हे काळ्या-निळ्या रंगाचे फोटो सध्या चाहत्याचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. काळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटोंमध्ये उर्वशी स्टनिंग आणि ग्लॅमरस दिसत आहे. तर निळ्या रंगाच्या बिकीनीत ती कमालीची हॉट दिसत आहे. सध्या उर्वशीचे हे फोटो सोशलवर ट्रेंड होताना दिसत आहेत.

ज्या फोटोंमध्ये उर्वशी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे ते फोटो एअरपोर्टवरील आहेत. फोटोत दिसत आहे की, तिनं कॅज्युअल आउटफिट केला आहे. तिच्या पिंक कलरच्या आयशॅडोमध्ये उर्वशी कमालीची सुंदर दिसत आहेत. उर्वशीनं मिनिमल मेकअप केला आहे.

https://www.instagram.com/p/B9e25jVhWgV/?utm_source=ig_embed

ज्या फोटोंमध्ये ती निळ्या, आकाशी रंगाच्या बिकीनीत दिसत आहे ते फोटो तिचे मालदीवमधील आहेत. मालदीवमध्ये तिनं स्कुबा डायव्हींगचाही आनंद घेतला. तिनं बिकीनी फोटो सोबतच स्कुबा डायव्हींगचेही फोटो सोशलवरून शेअर केले आहेत. उर्वशीचे हे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B9YrW4Rh0-j/?utm_source=ig_embed

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर सनी देओलसोबत उर्वशीनं आपला बॉलिवूड डेब्यू केला होता. सिंह साहब दी ग्रेट असं तिच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं. याशिवाय तिनं अनेक म्युझिक व्हिडीओत काम केलं आहे. रॅपर हनी सिंगच्या लव डोस गाण्यातही ती दिसली आहे. भाग जानी, सनम रे अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे. 22 नोव्हेंबर 2019 रोजी रिलीज झालेल्या पागलपंती मल्टीस्टारर सिनेमातही तिनं काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B9b0w7DByVj/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/B9G0t3Shtro/