दुसऱ्यांचं ट्विट Copy Paste केल्यानं कायमच वादात राहिलीय उर्वशी रौतेला, आता सांगितल यामागील कारण !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अटेंशन घेत आहेत. सध्या रेग्युलर बिकिनीत दिसत असलेली उर्वशी आता वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. अनेकदा ट्विट कॉपी पेस्ट केल्यानं ती वादात सापडली आहे. यावर आता उर्वशीनी प्रतिक्रिया यामागील कारण सांगितलं आहे.

सेलेब्रिटीची टीम करते काम
उर्वशी म्हणते, कोणीच कोणावर टिप्पणी करण्याच्या स्थितीत नाही. ती जे काही लिहिते त्यासाठी तिच्यावर आरोप करणं अयोग्य आहे. प्रत्येकाला हे माहित आहे की, प्रत्येक सेलेब्रिटीच्या मागे एक टीम आहे जी सोशल मीडिया पोस्टींगचं काम पहात असते.” ट्विट चोरी करण्याच्या आरोपांमुळं उर्वशी रोतैला आजवर अनेकदा ट्रोलिंगची शिकार झाली आहे.

एखादी पॉझिटीव्ह पोस्ट कॉपी करणं गुन्हा नाही
उर्वशी पुढे म्हणते, “मी यासाठी कोणाला दोषी मानत नाही. कारण लोक चांगल्या गोष्टी पसंत करू शकतात आणि त्यापासून प्रेरीत होऊ शकतात. परंतु जर कोणी यावरून धमकावत असेल किंवा दुसऱ्यांवर आरोप करत असेल तर हे चुकीचं आहे. मी कायम इतरांना सकारात्मक राहण्यासाठी आणि प्रेरीत राहणयासाठी प्रोत्साहित करत असते. म्हणून ट्रोल करण्याआधी सत्य जाणून घेणं गरजेचं आहे.” असं ती सांगते.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात दिसणार आहे. यातील एक आयटम नंबरीही अलीकडेच रिलीज करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत आणि पागलपंती सिनेमात दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे. सिंह साहब दी ग्रेट या सिनेमातून तिनं सनी देओलसोबत बॉलिवूड डेब्यू केला होता.