US Election 2020 : निवडणुकीबद्दल ‘बेबी डॉल’ सनीनं दिली प्रतिक्रिया ! म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिकेच्या निवडणुकीवर (US Election 2020) लागून राहिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा सत्ता काबीज करतील की, जो बायडन (Joe Biden) हे पुढचे अध्य होतील याबाबत लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण दोघांमध्ये जोरदार मुकाबला पहायला मिळत आहे. आता अमेरिकेच्या निकालाबद्दल बॉलिवूडमधील हॉट ॲक्ट्रेस सनी लिओनी (Sunny Leone) हिनंही प्रतिक्रिया दिली आहे.

सनीनं शेअर केली पोस्ट
सनीनं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती तिच्या पतीसोबत दिसत आहे. सनी आणि तिच्या पतीनं मतदान केलं आहे. तिनं इतरांनाही प्रश्न केला आहे की, त्यांनी मतदान केलं आहे का. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सनीनं निकालाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

सनीनं शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये सनी लिहिते की, हा सस्पेन्स मला मारून टाकेल. सनी लिओनीला राजकारणात एवढा रस आहे हे पाहून चाहतेही चकित झाले आहेत. सनीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती लवकरच ती हॉरर कॉमेडी सिनेमा कोका कोला, रंगीला, वीरमादेवी आणि हेलेन अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती.