डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला ‘झटका’ ! आता ‘एवढ्या’ रूपयांनी वाढवली ‘H-1B’ Visa अर्जाची ‘फीस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत काम करणाऱ्यांना व्हीजासाठी आता जास्त खर्च करावा लागणार आहे. अमेरिकन प्रशासनाने H-1 बी व्हीजासाठी 700 रुपयांनी वाढवली आहे. या अतिरिक्त फीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन सिस्टम (ERS) ला मदत मिळणार आहे. यामुळे व्हीजासाठी येणाऱ्या लोकांची निवड सोपी होईल.

काय असणार नेमका शुल्क
H-1बी व्हीजासाठी 32 हजार रुपए घेतले जातात.
या व्यतिरिक्त कंपनीला फसवणूक रोखण्यासाठी आणि तपासणीसाठी 35 हजार अतिरिक्त खर्च देखील उचलावा लागतो. प्रीमियम क्लाससाठी 98 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च देखील केला जातो.

कसा आहे नेमका एच-1 बी व्हीजा
अमेरिका दर वर्षी उच्च कंपन्यांमध्ये बाहेरील लोकांना काम करण्याची परवानगी देते त्यासाठी एच-1 बी व्हीजा काढावा लागतो. मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प प्रशासनाने याबाबत भारतीय नागरिकांना निशाण्यावर धरले होते म्हणूनच येथील एच-1 बी व्हीजा साठी अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांचे जास्त अर्ज रद्द करण्यात आले होते.

एच-1 बी व्हीजासाठी कसा केला जातो अर्ज
यासाठी आधी इआरएस मध्ये नाव नोंदणी करावी लागते. एच-1 बी व्हीजासाठी अर्ज केलेल्यांची आधी तपासणी केली जाते आणि त्यांचे उच्च शिक्षण व इतर बाबी लक्षात घेऊन त्यांना हा व्हीजा दिला जातो.

फसवणूक कमी होण्याची शक्यता
केन कुचिनेली यांनी सांगितले की यामुळे फसवणुकीचे प्रकार कमी होतील आणि योग्य उमेदवारालाच याचा फायदा मिळवता येईल. यूएससीआईएस ने दिलेल्या माहितीनुसार या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सध्या सुरु आहेत. 2021 पासून इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन सिस्टम लॉंच केली जाऊ शकते.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like