Video : डोनाल्ड ट्रम्प यांचं ऐतिहासिक पाऊल ; उ. कोरिया व द. कोरियाच्या मध्यावरील असैन्य ‘प्रायव्दीप’वर घेतली किम जोंग यांची भेट

सेऊल : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रविवारी उत्तर कोरियाच्या ऐतिहासिक यात्रेवर पोहचले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा उत्तर कोरियाचा पहिलाच दौरा आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी माध्यमांच्या साक्षीने एकमेकांशी हस्तांदोलन करत फोटोग्राफर्सना खास पोज दिल्या. ट्रम्प आणि किम जोंग यांची ही तिसरी भेट आहे.

या ऐतिहासिक दौऱ्याच्या दरम्यान ट्रम्प दक्षिण आणि उत्तर कोरियाच्या सीमेवर पोहचले. या ठिकाणी किम यांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. नंतर दोघांनी उत्तर कोरियाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या जमिनीवर पाऊल ठेवताच किम यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यांनी नंतर हस्तांदोलन केले आणि मीडियाला फोटो काढण्यासाठी पोज दिली.

यानंतर दोघांनीही दक्षिण कोरियात प्रवेश करून पत्रकारांना संबोधित केले. ट्रम्प यांनी सांगितले की, जगासाठी हा महत्वपूर्ण क्षण आहे. येथे येणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ट्रम्प यांनी अचानकच या दौऱ्यासंबंधीची माहिती ट्विटरवरून दिली होती.

अण्वस्त्र निःशस्त्रीकरणासाठी ही महत्वाची गोष्ट आहे. याआधी ट्रम्प आणि किम हनोईमध्ये भेटले होते. परंतु ती भेट निष्फळ ठरली होती. ट्रम्प आणि किम पहिल्यांदा सिंगापूर येथे भेटले होते.

जाणून घ्या : योग्य ‘परफ्युम’ची निवड आणि वापर कसा करावा

मधुमेहावर मिळवू शकता नियंत्रण, हे फार नाही अवघड

सकाळचा चहा करतो ताण-तणावापासून सुटका, आहेत विविध फायदे

कडुबाई खरात यांच्यासह अनेक मातंग बांधव घेणार धम्मदीक्षा

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन