US : विमानाच्या पायर्‍या चढताना तीनवेळा पडले बायडेन, घटनेचा Video आला समोर

नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बायडेन विमानाचा जिना चढत असताना अडखळताना दिसत आहेत. वायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष विमानाच्या पायर्‍या चाढताना तीन वेळा पडले. मात्र, त्यांनी स्वत:ला सांभाळले आणि सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी अ‍ॅटलांटाच्या दौर्‍यावर जात होते, जिथे त्यांना आशियाई-अमेरिकन समाजाच्या नेत्यांची भेट घ्यायची होती. अ‍ॅटलांटाला जाण्यासाठी ते एयरफोर्स वनच्या पायर्‍या चाढत असताना त्यांचे नियंत्रण सुटले आणि ते जिन्यावर अडखळले. बायडेन यांच्याबाबतीत हा प्रकार तीनवेळा घडला.

 

 

https://twitter.com/Breaking911/status/1372946685328957442

 

 

 

विमानाच्या जिन्यावर ते तीनवेळा पडले. पडल्यानंतर ते दोनवेळा हाताच्या आधाराने उठले. परंतु तिसर्‍यावेळी गुडघ्यांवर पडले. व्हिडिओमध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन हे विमानाचा जिना साईड रेलिंगला धरून चढताना दिसत आहेत.

जिन्याच्या वरच्या टोकाला पोहचल्यानंतर बायडेन सॅल्यूट करून विमानाच्या आत गेले. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, राष्ट्राध्यक्ष 100 टक्के ठिक आहेत. जिन्यावर चुकीची पावले पडण्याशिवाय हे बाकी काही नाही.

सांगण्यात आले की, जिन्यांवर चढताना हवेचा वेग खुप जास्त होता. बहुतेक यामुळे 78 वर्षीय जो बायडेन यांची पावले चुकीची पडली आणि त्यांचे नियंत्रण सुटले. सध्या ती पूर्णपणे ठिक आहेत.