अमेरिकन व्हिसाच्या नियमांमध्ये मोठे बदल ; जाणून घ्या कोणत्या नियमांमध्ये झाले बदल

वॉशिंगटन : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने अमेरिकन व्हिसाच्या नियमांमध्ये बदल करत नियमांची भली मोठ्ठी यादी जाहीर केली आहे. नव्या नियमांनुसार आता व्हिसा हवा असणा-यांना आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटचे नाव आणि मागील पाच वर्षाचे रेकॉर्ड द्यावे लागणार आहे. नव्या नियमानुसार ट्रम्प प्रशासन आपले सोशल मीडिया अकाऊंट कधीही तपासू शकतात. तसेच व्हिसासाठी करण्यात येणा-या अर्जामध्ये मागील पंधरा वर्षातील आपल्या आयुष्याबद्दल आणि शारिरीक बदलांबाबत विचारले जाऊ शकते.

नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन नियमांमध्ये बदल करण्यात आले असल्याचे अमेरिकी प्रशासनाने सांगितले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी देशात येणा-या प्रत्येक व्यक्तीची ओळख आणि त्याबाबतचे ठोस पुरावे असणे गरजेचे आहे. त्यामुळे वीजाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या नियमांना शिक्षणाशी संबंधीत अधिकारी आणि एकेडमिक ग्रुपने या नियमांना विरोध केला आहे.

असे आहेत नवे नियम

सोशल मीडियाचे ५ वर्षाचे रेकॉर्ड
जुन्या पासपोर्टचा नंबर आणि संपूर्ण माहिती
ई-मेल आयडी, फोन नंबर जो मागील पाच वर्षे वापरलेला असेल
मागील १५ वर्षात तुम्ही कुठे-कुठे राहिलात, कोठे शिक्षण घेतले, कोठे नोकरी केली आणि कोण-कोणत्या ठिकाणी फिरलात याची संपू्र्ण माहिती द्यावी लागणार आहे.

नियम सर्वांसाठी लागू
यापूर्वी अमेरिका परराष्ट्र विभागाने सांगितले होते की, ज्यांना आतंकवादी किंवा एखाद्या राष्ट्राकडून धोका आहे अशाच व्यक्तींकडून ही माहिती मागवली जात होती. मात्र आता सर्वांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

मार्च २०१८ च्या नियमांना मंजुरी

ट्रम्प प्रशासनाने मार्च २०१८ मध्ये काही नियम केले होते. ते नियम प्रलंबीत होते. या नियमांना विरोध असताना देखील या नियमांना मंजुरी देण्यात आली आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार अर्जदाराच्या सोशल मीडियाच्या रेकॉर्डनुसार त्याच्या स्थलांतराची माहिती मिळू शकेल. मागील वर्षी अमेरिकी व्हिसासाठी देशभऱातून १.४७ कोटी अर्ज आले होते.