पृथ्वीवरील ‘स्वर्ग’ समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये सरकारी नोकरीची ‘सुवर्ण’संधी, लवकरच ‘रिक्त’ पदांवर भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर आता तेथील जनजीवन सामान्य पातळीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री देशाला संबोधित केले. यावेळी भाषणात मोदींनी जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये न भरलेल्या पदांसाठी लवकरच प्रक्रिया सुरु करणार असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर लडाखमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता इतर केंद्रशासित प्रदेशांप्रमाणे पगार आणि अन्य सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

स्थानिक युवकांना रोजगाराची संधी

केंद्र सरकारच्या ता निर्णयामुळे लवकरच या ठिकाणी नोकरभरती होणार असून यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर लडाखमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता इतर केंद्रशासित प्रदेशांप्रमाणे पगार आणि अन्य सुविधा पुरवल्या जाणार आहेत. जम्मू काश्मीरमधील कर्मचाऱ्यांना एलटीसी, हाउस रेंट अलाउंस, आरोग्य विमा आणि मुलांसाठी शैक्षणिक अनुदान देखील मिळणार आहे.

लष्करात होणार मोठ्या प्रमाणात युवकांची भरती

सध्या जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी हि समस्या असून सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी नोकरी मिळवण्याचा हा मोठा मार्ग आहे. त्याचबरोबर मोदींनी हि घोषणा करून युवकांना आकर्षित करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर खासगी कंपन्यांमध्ये देखील या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात जागा निर्माण होणार असून युवकांना या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत सैन्यभरतीची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त