खुशखबर ! DGCI नं दिली ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ लसींना तातडीच्या वापराची संमती

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून चांगले संकेत देत आहे. १ जानेवारीला देशाला पहिल्या करोना लशीच्या बातमीने खुश केले, तर दुसऱ्याच दिवशी २ जानेवारीला पहिल्या स्वदेशी करोना लशीची बातमी मिळाली. या मुळे देशातील जनतेचा आनंद द्विगुणित झाला. आता करोना लशीबाबत भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने (DCGI) भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. दरम्यान दोन्ही लसींना संमती देण्यात आल्याने लसीकरणाच्या मोहिमेतलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.

 

 

 

 

 

 

 

भारतात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती लसीकरणाच्या मोहिमेची. सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. कालच ड्राय रनही पार पडला. आता प्रतीक्षा होती ती आपात्कालीन वापरासाठी दोन्ही लसींना संमती मिळते की नाही याची. आणि त्याला डीसीजीआयने मान्यता दिली आहे.