Maharashtra Unlock : राज्यातील या 18 जिल्हयांमधील सर्व निर्बंध मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण 5 टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vadettiwar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच उद्यापासून 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे. 5 टक्के पाॅझिटीवेहीटी रेट अन् ऑक्सिजन 25 टक्के बेड आहेत, तेथे लाॅकडाऊन राहणार नाही. याठिकाणी माॅल्स, हाॅटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन राहणार नसल्याचेही वडेट्टीवार (Vadettiwar) यांनी सांगितले.

IAS Transfers : राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती

दुसरीकडे पहिल्या पातळीत येणाऱ्या जिल्ह्यात खासगी व सरकारी कार्यालयांना 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिल्याचे वडेट्टीवार (Vadettiwar) यांनी सांगितले.
दुसरीकडे मुंबईचा पॉझिटिव्ही रेट जास्त असल्याने काही निर्बंध तसेच ठेवले आहेत.
ठाण्यात मात्र पूर्ण अनलॉक केले असून कार्यालये, सर्व दुकाने, मॉल्स सुरू होणार आहे.
मुंबईत लोकल सुरू नसल्याने येथेही सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करता येणार नाही.
मात्र पुढील आठवड्यात मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तर लोकल सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र, म्हणाले – ‘गोपीनाथ मुंडे असते तर OBC आरक्षण रद्द करण्याची तुमची हिंमत झाली नसती’

या पहिल्या टप्प्यात एकूण 18 जिल्ह्यांचा समावेश केला आहे.

यात धुळे, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ.
याठिकाणी आता पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे.
याची अंमलबजावणी उद्यापासूनच केली जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही.
तसेच थिएटर्स, कार्यालये शूटिंग, जिम, सलून सुरु राहतील.
त्यात सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे.
दरम्यान दुसऱ्या टप्प्यात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमास 50 टक्के परवानगी असेल.
लग्न सोहळ्यास हॉलना 50 टक्के आणि जास्तीत जास्त 100 लोकांना उपस्थिती राहण्याची मुभा राहिल. तसेच अंत्यविधी सोहळ्यास सगळ्यांना उपस्थितीत राहता येईल.

Pune : कुविख्यात तम्मा कुसाळकर गँगच्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, पिस्तुलासह 3 जिवंत काडतुसे जप्त