वडगांव मावळ : कंपनीच्या गोडाऊनमधून चार लाखांचा ऐवज लंपास

वडगांव मावळ : पोलीसनामा ऑनलाईन

कंपनीच्या गोडाऊनचे शटर उचकटून गोडाऊनमधील तीन लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना सोमवारी (दि.२३) सकाळी नऊच्या सुमारास वडगाव मावळ मधील अविनाश कार्गो प्रा. लि. कंपनीच्या गोडाऊनमध्ये घडली.

अमोल संपत गुरव (वय-३५, रा. तळेगाव, ता. मावळ) यांनी याप्रकरणी वडगाव मवाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B00KNN4N4I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’41b32558-8f5d-11e8-bf36-67a34e5f73b9′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश कार्गो कंपनीचे वडगाव मावळयेथे ढोरे वस्तीमध्ये गोडाऊन असून शनिवारी रात्री आठ वाजता कामगारांनी गोडाऊन बंद केले. त्यानंतर अज्ञात चोरटयांनी गोडाऊनचे शटर उचकटून गोडाऊन मधील पीव्हीसी फिल्मचे पाच बॉक्स, मिका रोलचे दोन बॉक्स, मॉलरेल सिलिकॉनचे चार बॉक्स, गियर बॉक्स टॉप कव्हरचे दोन बॉक्स, जीई फ्युजचे दोन लाकडी बॉक्स, ग्रीन हाऊसची एक क्लॅम्पबॅग, जेसीबी इंडिया कंपनी मशीन पार्टचे सात बॉक्स, एसीजी पाम पॅक कंपनीचा मशीनचा एक पार्ट, क्लॅमचे एक पाकीट, पॉली एफ प्लस मटेरियलचा एक बंडल आणि रेलिंग स्टिकरचा एक बॉक्स असा एकूण ३ लाख ७६ हजार ७५७ रुपयांचा ऐवज चोरून नेला. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.