Vadgaon Sheri Pune Crime | पुणे : भिंतीवर सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या, सहा जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vadgaon Sheri Pune Crime | सासरच्या लोकांकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला (Physical and Mental Distress) कंटाळून एका तरुणाने राहत्या घरात गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली आहे. तरुणाने आत्महत्येपूर्वी भिंतीवर सुसाईड नोट लिहिली आहे. याप्रकरणी सहा जणांवर चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Vadgaon Sheri Pune Crime)

सिजू खिस्तोफर जोसेफ (वय-38 रा. निर्मला अपार्टमेंट, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मंजुमंत्रा जोसेफ, अगस्टीन वल्लापुरहिल, राहेल डिसोझा, अरोन डिसोझा, रॉबर्ट, एलिझाबेथ यांच्यावर आयपीसी 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सिजू जोसेफ याच्या 60 वर्षीय आईने चंदननगर पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.16) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिजू इलेक्ट्रिशन होते. ते सायंकाळी कामावरुन घरी आले. त्यावेळी घरात कोणी नव्हते.
सिजू यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सिजू यांनी खोलीचा दरवाजा बंद केला होता. कुटुंबीयांनी दरवाजा वाजविला.
आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी याची माहिती चंदननगर पोलिसांना दिली.
पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा सिजू यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

सासरकडील नातेवाईकांनी सिजू यांना त्रास दिल्याने ते मागील काही दिवसांपासून तणावात होते.
नैराश्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. सिजू यांनी आत्महत्या करण्यापूर्वी घरातील भिंतीवर आरोपींच्या सततच्या
त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे पेनाने लिहून ठेवले आहे.
आरोपींनी सिजू याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
यावरुन पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माने करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार