Mundhwa Police Pune | रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा! प्रवाशाची रिक्षात विसरलेली बॅग मुंढवा पोलीस ठाण्यात केली जमा; पोलिसांकडून रिक्षाचालकाचे कौतुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mundhwa Police Pune | रिक्षातून प्रवास करणाऱ्या बहुतांशी नागरिकांना रिक्षाचालकांच्या मुजोरपणाचाच अनुभव येत असतो. त्यातही बहुतेक रिक्षाचालकांच्या अरेरावी वा रिक्षा भाड्यातून लुटमारीचा अनुभव अनेकांना येतो. परंतु त्यातही काही रिक्षाचालक हे आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करीत असल्याचाही काही प्रवाशांना अनुभव आहे. असा अनुभव मुंढवा येथील एका प्रवाशाला आला.

रिक्षा चालक राजेश चंद्रकांत संघावार (वय-56 रा. शिंपी आळी, मुंढवा) यांना त्यांच्या रिक्षामध्ये एक प्रवाशाची लॅपटॉप बॅग मिळून आली. या बॅगेमध्ये 70 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व इतर महत्त्वाची कागपत्रे होती. महागड्या लॅपटॉपचा कोणताही लोभ न करता, आर्थिक आपेक्षा न धरता ही बॅग राजेश यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात जमा केली.

पोलिसांनी बॅगेमधील कागदपत्रांची व इतर वस्तुंची पाहणी केली असता लॅपटॉप बॅगमध्ये पासवर्ड लिहुन ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी पासवर्डच्या मदतीने लॅपटॉप लॉक खोलून त्यामधील ई-मेल वरुन ई-मेल आयडी प्राप्त केला. त्यावर लॅपटॉप बॅग मिळाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लॅपटॉप मालक सुरज हेमराजनी यांनी पोलिसांकडे संपर्क साधून कामानिमित्त बाहेर गावी असल्याचे सांगितले. तसेच त्यांचा ओळखीचे शेखर हीरवे यांना पाठवून दिले. पोलिसांनी मुळ मालक व नसल्याने खातरजमा करुन शेखर हिरवे यांच्याकडे लॅपटॉपची बॅग दिली.

गहाळ झालेला लॅपटॉप परत मिळाल्याने शेखर हिरवे, सुरज हेमराजनी व स्थानिक नागरिकांनी रिक्षा चालक राजेश संघावार व पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक केले. रिक्षा चालक राजेश संघावार यांनी कोणताही लोभ न बाळगता लॅपटॉपची बॅग पोलीस ठाण्यात जमा करुन ती मुळ मालकास परत करण्यास मदत करुन माणुसकीचे उत्तम उदाहरण जनतेसमोर ठेवले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामाची वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, यांनी दखल घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस आयुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे, पोलीस अंमलदार सचिन अडसुळ, तानाजी देशमुख, निलेश पालवे, शितल मेमाणे, प्रितम लाड, मनिषा बर्वे व टीमने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Eknath Shinde Group नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी हक्क सांगू लागल्याने शिंदे गटाचा नेता संतापला, ”शिंदेंनी सगळ्या जागा सोडायचं मान्य केलं का?”

Cheating Fraud Case Pune | पुणे : आयटी अभियंता तरुणीला 14 लाखांचा गंडा, स्काईप आयडीवरून अंगावरील तीळ दाखवण्यास भाग पाडले

Shirur Lok Sabha | आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील दोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण

Amol Kolhe On Ajit Pawar | पलटी सम्राट आणि खोके सम्राटपेक्षा नटसम्राट कधीही चांगलं डॉ. अमोल कोल्हे यांचा अजितदादांवर प्रतिहल्ला