Baramati Lok Sabha Election 2024 | अजित पवारांनीही उमेदवारी अर्ज घेतला, रोहित पवार म्हणाले, ”…तर काकींचा अर्ज मागे घेऊन दादा स्वत: निवडणूक लढवतील”

बारामती : Baramati Lok Sabha Election 2024 | आधी अजित पवार आदेश द्यायचे, आता त्यांना दिल्लीचे आदेश ऐकावे लागतात. आता दिल्लीवरून आदेश आले तर काकींचा अर्ज मागे घेऊन अजित पवार यांना इच्छा नसताना अर्ज दाखल करावा लागेल, असा खोचक टोला रोहित पवार यांनी अजित पवारांना लगावला आहे. (Rohit Pawar On Ajit Pawar)

काल लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांच्यासह अजित पवारांच्या नावाने देखील उमेदवारी अर्ज खरेदी करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. याबाबत रोहित पवार यांनी वरील खोचक वक्तव्य केले.(Baramati Lok Sabha Election 2024)

रोहित पवार म्हणाले, दिल्लीवरून आदेश आले असतील तर दादा काहीपण करतील. आधी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अजित पवार हे स्वत: आदेश द्यायचे. आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो.

अजितदादांना टोला लगावताना रोहित पवार पुढे म्हणाले, अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि दिल्लीवरून
आदेश आला की, तुमचा अर्ज कायम ठेवा आणि काकींचा अर्ज मागे घ्या, तर अजितदादांना ते मनाविरुद्ध असलं तरी
ऐकावे लागेल. त्यामुळे ते त्याबाबतीत काय करतात हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरूद्ध अजित पवार
यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे.
खरं तर निवडणूक, राजकारण आणि संसदेतील दांडगा अनुभव असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर सुनेत्रा पवार
यांची उमेदवारी तुल्यबळ म्हणायची तर केवळ अजित पवारांमुळेच.

सुनेत्रा पवार यांचे सासर-माहेरचे कुटुंब राजकीय आहे, अजित पवार यांच्या त्या पत्नी आहेत, त्यांचे राजकारण जवळून
पहात आहेत, हाच त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे कोणतीही जोखिम नको म्हणून भाजपाकडून (BJP) असा आदेश सुद्धा
येऊ शकतो, अशी चर्चा आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Eknath Shinde Group नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी हक्क सांगू लागल्याने शिंदे गटाचा नेता संतापला, ”शिंदेंनी सगळ्या जागा सोडायचं मान्य केलं का?”

Cheating Fraud Case Pune | पुणे : आयटी अभियंता तरुणीला 14 लाखांचा गंडा, स्काईप आयडीवरून अंगावरील तीळ दाखवण्यास भाग पाडले

Shirur Lok Sabha | आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील दोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण

Amol Kolhe On Ajit Pawar | पलटी सम्राट आणि खोके सम्राटपेक्षा नटसम्राट कधीही चांगलं डॉ. अमोल कोल्हे यांचा अजितदादांवर प्रतिहल्ला