Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेच्या रणांगणात ‘एमआयएम’ची लवकरच एंट्री? होऊ शकते चौरंगी लढत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेसाठी सध्यातरी भाजपा (BJP), काँग्रेस (Congress) आणि वंचित Vanchit Bahujan Aghadi (VBA) अशी तिरंगी लढत दिसत आहे. अनुक्रमे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वसंत मोरे (Vasant More) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, लवकरच या रिंगणात ‘एमआयएम’ MIM (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन) ची एंट्री होऊ शकते. त्यामुळे ही लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे. पुण्यात उमेदवारी देण्यासाठी ‘एमआयएम’कडून राजकीय मोर्चेबांधणी सुरू असल्याचे वृत आहे.(Pune Lok Sabha Election 2024)

MIM महापालिकेच्या राजकारणातील एका माजी पदाधिकाऱ्याला पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. याबाबत ‘एमआयएम’कडून अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. परंतु, पुणे लोकसभेसाठी उमेदवार उभा करण्यासाठी ‘एमआयएम’च्या हालचाली मात्र सुरू आहेत. ‘एमआयएम’ने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पुणे लोकसभेचे तिनही उमेदवार दिग्गज आहेत. त्यांनी शहर पातळीवर केलेले काम महत्वाचे मानले जाते. ‘एमआयएम’कडून कोणाला उमेदवारी देण्यात येते हे आता पहावे लागणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Eknath Shinde Group नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी हक्क सांगू लागल्याने शिंदे गटाचा नेता संतापला, ”शिंदेंनी सगळ्या जागा सोडायचं मान्य केलं का?”

Cheating Fraud Case Pune | पुणे : आयटी अभियंता तरुणीला 14 लाखांचा गंडा, स्काईप आयडीवरून अंगावरील तीळ दाखवण्यास भाग पाडले

Shirur Lok Sabha | आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील दोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण

Amol Kolhe On Ajit Pawar | पलटी सम्राट आणि खोके सम्राटपेक्षा नटसम्राट कधीही चांगलं डॉ. अमोल कोल्हे यांचा अजितदादांवर प्रतिहल्ला