‘बाबा बायकांवर लय पैसा उडतो’, ‘या’ 8 वर्षाच्या चिमुकल्याला Valentines Day ची ‘ॲलर्जी’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतीच फेब्रुवारीला सूरुवात होत आहे. लवकरच वॅलेंटाईन डेजला सुरुवात होत आहे. अनेक कपल महागडे गिफ्ट देतात एकमेकांवर खूप खर्च करतात. नेहमीच हा दिवस खर्चिक असल्याचं बोललं जातं. असंच काहीसं सांगणारा एका 8 वर्षांच्या चिमुकल्याचा एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो मुलग लग्न करायचं नाही असं म्हणत आहे आणि यामागील कारणही सांगत आहे.

वैभव शेटकर यांनी हा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “ह्याला म्हणतात व्हॅलेंटाईन डेची ॲलर्जी. 8 वर्षांच्या पोराला आयुष्याचं सार कळलंय राव!” वैभव यांचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जे या 8 वर्षांच्या मुलाला कळालं ते नव्या प्रेम करणाऱ्यांना आणि लग्न करणाऱ्यांना कधी कळणार ? असंही काहींनी म्हटलं आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, त्या मुलाचे वडिल त्याला प्रश्न विचारत आहेत आणि तो त्यांना सांगत आहे की, बायकांच्या कशा मागण्या असतात. या मागण्या पुरवताना आपल्याला कसं नाकनव येतं. वडिलांनी हा व्हिडीओ शुट केला आहे. वॅलेंटाईन डेच्या पार्श्वूमीवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या सगळीकडे या चिमुकल्याची चर्चा होताना दिसत आहे.