वंचितची ‘कपबशी’ विधानसभेला ‘प्रहार’च्या हाती !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत सर्व जागा लढवून महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’ला विधानसभा निवडणुकीत मात्र ‘कपबशी’ चिन्हापासून वंचित राहावे लागणार आहे. कारण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला प्रदान केले आहे. त्यामुळे वंचित आघाडीला आता विधानसभेला पुन्हा नवीन चिन्ह घेऊन लोकांसमोर जावे लागणार आहे.

वंचित आघाडीने लोकसभा निवडणुकीत सर्व ४८ जागा लढविल्या. त्यांना महाराष्ट्रात झालेल्या एकूण मतांच्या ८ टक्के मते मिळाली असती तर या पक्षास राज्यस्तरीय नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली असती, परंतु त्यांच्या उमेदवारांना मिळालेली मते ही ७.२ टक्के आहेत.

लोकसभेला दोन खासदार किंवा विधानसभेला १२ आमदार निवडून आले तर ही मान्यता
मिळते. तशी ती महाराष्ट्र नवनिर्माण पक्षास २००९ ला मिळाली व त्या पक्षासाठी ‘रेल्वे इंजिन’ हे चिन्ह राखीव झाले. वंचितकडून इम्पियाज जलील हे औरंगाबादमधून विजयी झाले, परंतु ते ‘एमआयएम’च्या चिन्हांवर निवडून आले. त्यामुळे दोन्ही निकषांवर त्यांना राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्ष म्हणून मान्यता मिळत नसल्याने चिन्हासाठी पुन्हा आयोगाकडे जाणे आवश्यक बनले.

परंतु, त्यांच्या अगोदरच आमदार कडू यांनी ‘कपबशी’ या चिन्हांवर आयोगाकडे दावा सांगितल्याने आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यांना हे चिन्ह मिळाले. प्रत्येक वेळेला नवीन चिन्ह घेऊन लोकांसमोर जाण्यात अडचणी येतात. कारण प्रचारासाठी दहा ते अकरा दिवसांचाच अवधी मिळतो. वंचितचे लोकसभेला ‘कपबशी’ हे चिन्ह घरोघरी गेले. राज्यात बारा ठिकाणी वंचितला मिळालेल्या मतांमुळे दोन्ही काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले.

याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडु यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपसोबत आघाडी करण्याचा विचार आहे. आम्ही राज्यातील दहा जागा लढविणार आहोत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आम्हाला सर्व २८८ जागांसाठी ‘कपबशी’ हे चिन्ह मिळाले आहे.

वंचित बहुजन आघाडीने कपबशी व शिट्टी हे चिन्ह केंद्रीय निवडणुक आयोगाकडे मागितले होते. आघाडीची राज्यातील सर्व २८८ जागा लढवायची तयारी सुरु असून सध्या जिल्हानिहाय मुलाखती घेतल्या जात आहे.

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या