Vanchit Bahujan Aghadi | लोकसभेसाठी वंचितचे आणखी 3 उमेदवार जाहीर, कल्याणमध्ये होणार तिरंगी लढत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Vanchit Bahujan Aghadi | वंचित बहुजन आघाडीने आणखी तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. वंचितने आज जमील अहमद यांना कल्याणमधून (Kalyan Lok Sabha) , मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून (Mumbai North Central Lok Sabha) संतोष गणपत आंबुळगे तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Mumbai South Lok Sabha Constituency) अफझल दाऊदानी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांचे पूत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Eknath Shinde) हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे शिवसेनेच्या वैशाली दरेकर-राणे निवडणूक रिंगणात आहेत. आता वंचितनेही या मतदार संघात आपला उमेदवार दिल्याने येथे तिरंगी लढत होईल.(Vanchit Bahujan Aghadi)

दरम्यान, मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात बहुसंख्य मतदार हे मुस्लिम समाजाचे असताना इथे मुस्लिम उमेदवार न देता वर्षा गायकवाड या बौद्ध उमेदवार देवून एक प्रकारे भाजपला जिंकून येण्यासाठी मोकळे रान सोडल्याचा आरोप वंचितने केला आहे.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये वंचितने म्हटले आहे की, वर्षा गायकवाड या काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ म्हणजे धारावी मतदारसंघातून लढतात आणि जिंकूनही येतात. त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे दक्षिण मध्य मुंबईमधून खासदार म्हणून जिंकून आलेले आहेत.

हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ सोडून उत्तर मध्य मुंबईमध्ये का उभ्या राहत आहेत? हा प्रश्न आहे.
साधे गणित असे की, जिथे वंचित बहुजन आघाडीची पकड अधिक आहे, तिथे आपण उभे राहणे आणि जिंकण्याची अधिक
संधी घेणे हे कुठल्याही शेंबड्या पोराला समजू शकते. तर हे वर्षाताई यांना का समजू नये?

ज्या मतदारसंघातून त्या उभ्या राहिल्या आहेत, त्या मतदारसंघात गेल्या ५ वर्षात त्या फिरकल्या सुद्धा नाहीत.
शिवाय उत्तर मध्य जिल्ह्यामध्ये बहुसंख्य मतदार हे मुस्लिम समाजाचे असताना इथे मुस्लिम उमेदवार न देता बौद्ध
उमेदवार देवून एक प्रकारे भाजपला जिंकून येण्यासाठी मोकळे रान सोडले आहे.

या सर्व पाश्र्वभूमीवर वर्षाताईंना विचारायचे आहे की, आपण असा स्वतःचा बळी द्यायला का तयार झालात? की भाजपाची
ही नवीन खेळी आहे? आपले शिक्षक भरतीमधील घोटाळा बाहेर काढण्याबाबतचे संकेत तर नाही ना? काँग्रेसच्या
नेत्यांना तुम्हाला जिंकून आणायचे आहे की, पाडायचे आहे? असे प्रश्न वंचितने एक्सवरून विचारले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Lok Sabha | सांगलीच्या राजकारणात मोठी घडामोड, ‘वंचित’ने पाठिंबा दिल्याने विशाल पाटील यांची बाजू मजबूत!

Sharad Pawar On PM Narendra Modi | ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर ! होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार