Vanchit Bahujan Aghadi | ‘वंचित’चा पहिला उमेदवार जाहीर! बुलढाण्यातून ‘या’ जुन्या-जाणत्या नेत्याला उमेदवारी, मविआतून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब?

बुलढाणा : वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीसोबतची (Mahavikas Aghadi) बोलणी फिस्कटल्याचे प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) जाहीर केले होते, तसेच वंचित (VBA) आणि ठाकरे गटाची (Shivsena UBT) युतीदेखील तुटल्याचे आंबेडकर यांनी म्हटले होते. आता धक्कातंत्राचा वापर करत प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून जुनेजानते नेते वसंत मगर (Vasant Magar) यांना उमेदवारी दिली आहे.(Vanchit Bahujan Aghadi)

वंचितने काल रात्री पार पडलेल्या राज्य समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आणि आज त्याची घोषणा केली. हा वंचितचे विरोधक आणि स्वपक्षीय यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या उमेदवारीतून वंचितने मागील निवडणुकीतील सोशल फॉम्र्युला वापरण्याचे संकेत दिले आहेत.

कोण आहेत वसंत मगर

  • शिवसेनेतून राजकीय क्षेत्रात पदार्पण.
  • छगन भुजबळ यांच्यामुळे त्यांना १९९० मध्ये सिंदखेडराजा विधानसभेची उमेदवारी मिळाली.
  • १९९५ मध्ये भारिप बमसंकडून सिंदखेडराजा विधानसभेची निवडणूक लढविली.
  • सध्या ते राजकारणापासून अलिप्त होते. वंचितच्या उमेदवारीमुळे पुन्हा चर्चेत आले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Katraj Crime | पुणे : दुचाकी स्लीप होऊन नर्सरीतील कुंड्या फुटल्याने हत्याराने वार, दोघांना अटक

Sadanand Date | मराठी पाऊल पडते पुढे! पुण्याचे सुपुत्र सदानंद दाते NIA च्या महासंचालकपदी

Pune Mahavitaran News | सदाशिव पेठेतील खोदाई लेखी परवानगीसह चलन भरूनच: महावितरणकडून स्पष्टीकरण

Pune Chandan Nagar Crime | मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या कामगाराला चंदननगर पोलिसांकडून अटक

Maharashtra Congress On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंवर काँग्रेस नाराज, ”चर्चा संपलेली नसताना उमेदवारी घोषित करणं हे आघाडी धर्माला गालबोट”

Pune Katraj Crime | पुणे : दुचाकी स्लीप होऊन नर्सरीतील कुंड्या फुटल्याने हत्याराने वार, दोघांना अटक