Vanchit Vikas | लहानग्यांनी लुटला रॅम्बो सर्कसचा आनंद ! ‘वंचित विकास’तर्फे फुलवा, अभिरुची वर्गातील मुलांसाठी सर्कसचा प्रयोग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vanchit Vikas | विदूषकांच्या (Clown) गमतीजमती, विविध साहसपूर्ण व चित्तथरारक प्रात्यक्षिके, पाळीव प्राण्यांच्या (Pets) लक्ष्यवेधी कवायती, मृत्यू गोलातील थरार, मुलामुलींचे कसरतीचे प्रयोग आणि रोमहर्षक नृत्य (Dance), सायकलवरच्या-दोरीवरच्या तोल सांभाळत केलेल्या कसरती, रिंगमास्टरच्या तालावर नाचणारे प्राणी पाहून लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. टाळ्यांचा कडकडाट मुलांनीही सर्कशीतील कलाकारांना (Vanchit Vikas) उत्स्फूर्त दाद दिली.

 

 

निमित्त होते, वंचित विकास संस्थेतर्फे (Vanchit Vikas Pune Maharashtra Institutions) फुलवा प्रकल्प (Fulwa Project) आणि अभिरुची वर्गातील लहान मुलांसाठी आयोजिलेल्या रॅम्बो सर्कस (Rambo Circus) प्रयोगाचे! सिंहगड रस्त्यावर (Sinhagad Road) लागलेल्या सर्कसचा प्रयोग पाहून कोरोनामुळे कोमेजलेल्या या चेहऱ्यावर हास्याचे धुमारे उडाले.
साडेतीनशेहून अधिक मुलामुलींनी याचा आनंद घेतला. संस्थेच्या संचालक मीनाताई कुर्लेकर (Meenatai Kurlekar),
सुनीताताई जोगळेकर (Sunitatai Joglekar), देवयानी गोंगले (Devyani Gongle), स्नेहल मसालिया (Snehal Masalia)
यांच्यासह प्रत्येक वर्गाच्या ताई उपस्थित होत्या.

 

 

स्नेहल मसालिया म्हणाल्या, “सर्कस बघायला सर्वांना आवडते.
पण वस्तीमधील मुलांना या गोष्टी बघायला मिळत नाहीत.
त्यामुळे वंचित विकास (Vanchit Vikas) संस्थेने या मुलांकरिता खास प्रयोगाचे आयोजन केले होते.
सर्कसमधील खेळ बघताना लहान मुलांच्या चेहेऱ्यावर हसू आणि आनंद दिसत होता.
यावेळी सर्व मुलांना खाऊंचेही वाटप करण्यात आले.
येथे असलेल्या प्राण्यांच्या प्रतिकृतीसोबत या मुलांनी खेळण्याचा, छायाचित्रे काढण्याचा आनंद घेतला.”

 

 

Web Title :- Vanchit Vikas | Rambo Circus children Vanchit Vikas

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Fatty Liver | वाढत्या वजनाचे कारण असू शकते लिव्हरसंबंधी समस्या, जाणून घ्या लक्षणे आणि बचावाची पद्धत

 

Mallika Sherawat Bold Bikini Photos | बोल्ड सीनमध्ये मर्यादा पार करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीनं शेअर केले असे काही फोटो, सोशल मीडियावर उडाली खळबळ

 

Gallbladder Stone | गॉलब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपचाराने करू शकता ठिक; जाणून घ्या

 

Gold-Silver Price Today | ‘सोने-चांदी’चे दर वधारले, सोने पुन्हा 51 हजारांवर तर चांदी 1 हजारांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव