Coronavirus : BHU च्या महिला प्रोफेसरनं 3 विद्यार्थीनींसह शोधलं COVID-19 च्या तपासणीचं सोपं ‘तंत्र’

वाराणसी : वृत्तसंस्था – देशात आणि जगभरात वेगाने वाढणाऱ्या कोरोना व्हायरसच्या जटिल तपासणीला नरी शक्तीने काशी येथे सोडवले आहे. आता तासंतास लागणाऱ्या या तपासणीला या महिलेने लावलेल्या शोधामुळे केवळ एकच तास लागू शकतो आणि यात रिस्क देखील कमी आहेत.

जगभरात कोरोनाची भयानक परिस्थिती बघता बीएचयू च्या महिला प्रोफेसर आणि त्यांच्या टीम ने महिन्याभरातच COVID-19 च्या अचूक तपासणीचे तंत्र शोधले आहे आणि त्यास पेटंट देण्याची प्रक्रिया दाखल केली आहे. डॉ. गीता राय, सहयोगी प्राध्यापक आणि त्यांची टीम सुश्री डोली दास, खुशबू प्रिया आणि हिरल ठक्कर, डिपार्टमेंट ऑफ मॉलिक्युलर अँड ह्यूमन जेनेटिक्स, बनारस हिंदू विद्यापीठाने COVID-19 साठी १००% अचूक आरटीसीआर आधारित क्लिनिकल चाचणी तंत्र डिझाइन केले आहे. एक तासात या तंत्राद्वारे तपासणी होईल, असा दावा डॉ. गीता राय यांनी केला आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर हे अनोखे प्रोटीन सिक्वेंस ला टार्गेट करते. जे केवळ COVID-19 मध्ये असते तसेच इतर कोणत्याच व्हायरल स्ट्रेन मध्ये आढळत नाही.

या तंत्रज्ञानाच्या नाविन्यपूर्ण आधारावर, पेटंट देखील दाखल केले गेले आहे. भारतीय पेटंट कार्यालयाच्या पूर्व तपासणीत असे आढळले आहे की देशात असे प्रोटीन सिक्वेंस लक्ष्यित करणारे आरटी-पीसीआर आधारित दुसरे किट नाही. देशात कोविड -१९ संसर्गाची वाढती स्थिती आणि अचूक / विशिष्ट / जलद आणि स्वस्त निदान देणाऱ्या कीटची कमी हे किट पूर्ण करू शकते.

यासंदर्भात पुढील मार्गदर्शन व पाठबळासाठी शिक्षकांनी CDSCO आणि ICMR संपर्क साधला आहे जेणेकरुन ते लोकांपर्यंत पोहोचवावे. या तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण आणि पूर्ण विकास करण्यासाठी संबंधित उद्योगाचा सहभाग आणि सहकार्य आवश्यक आहे. या विषयावर लवकरच सरकारने निर्णय घेतल्यास कोरोना विषाणूचा वेळेवर उपचार करून अनेकांचे जीव वाचण्यास मदत होईल.

याबाबत बोलताना डॉ .गीता रॉय म्हणाल्या की, आतापर्यंत बनविलेले किट या तत्त्वावर आधारित नव्हते. या तंत्राद्वारे आम्ही 2 ते 3 लाख मशीनवर चाचणी घेऊ शकतो, जे छोट्या छोट्या शहरांमध्ये आणि लॅबमध्ये उपयोगात आणता येईल. सध्याची टेस्टिंग मशिन्स महाग आहेत , जी कुठेही सहज सापडत नाही. अशा परिस्थितीत हे तंत्र बरेच सोपे आणि स्वस्त असल्याचे सिद्ध होईल. डॉ.गीता राय म्हणाल्या की, या तंत्राने १०० टक्के अचूक रिझल्ट मिळेल.