‘कोरियाग्राफर’ रेमो डिसूजानं केलं तिसऱ्यांदा लग्न, वरुन धवन म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसूजाने अलीकडेच आपल्या लग्नाचे 20 वर्षे पूर्ण केले आहेत. रेमोनं या प्रसंगाला खास बनवण्यासाठी पत्नी लिजेलसोबत तिसऱ्यांदा लग्न केलं. दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं आहे. लग्न खूपच शानदार झालं. लग्नाला अनेक सेलेब्रिटींनीही उपस्थिती दाखवली होती. अभिनेता वरुण धवनने हा प्रोग्राम आणखीच खास बनवला.

वरुणने आपल्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. कॅप्शन देताना वरुणने रेमोची थोडी मजा घेतली आहे. वरुण आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हणतो की, “रेमो डिसूजा आणि लिजेल अभिनंदन. लोकांना एकदा करायला जमत नाही आणि तुम्ही तीन वेळा केलं.” रेमोनेही आपल्या तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशलवर शेअर केले आहेत.

रेमोच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच त्याचा आगामी सिनेमा स्ट्रीट डान्सर 3डी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची शुटींगही पूर्ण झाली आहे. 24 जानेवारी 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. भूषण कुमार हा सिनेमा प्रोड्युस करत आहेत. डान्सर नोहा फतेही आणि प्रभू देवा हेदेखील या सिनेमात दिसणार आहेत.

Visit : Policenama.com