Varunraj Bhide Award | पुण्यातील जेष्ठ पत्रकार शैलेश काळे, अरुण मेहेत्रे यांच्या सह समर खडस आणि डी.के. वळसे पाटील यांना ‘वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Varunraj Bhide Award | ज्येष्ठ पत्रकार ‘वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली आहे. ‘मुख्य पुरस्कारा’ने महाराष्ट्र टाईम्सचे मुंबईतील विशेष वार्ताहर समर खडस (Samar Khadas) यांना तर ‘आश्वासक पत्रकारिते’साठी ‘आज का आनंद’ चे मुख्य वार्ताहर शैलेश काळे (Shailesh Kale), ‘झी 24 तास’ वाहिनीचे ज्येष्ठ बातमीदार अरुण मेहेत्रे (Arun Mehetre) आणि सकाळचे मंचर येथील बातमीदार डी.के. वळसे पाटील (DK Walse Patil) यांना सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात येत्या रविवारी (दि.28) सायंकाळी पाच वाजता पुरस्कारांचे वितरण होणार आहे.(Varunraj Bhide Award)

‘वरुणराज भिडे पुरस्कारा’चे यांदाचे 22 वे वर्ष आहे. मराठी पत्रकारितेत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या पत्रकारास ‘मुख्य पुरस्कार’ दिला जातो. तर शहरी आणि ग्रामीण भागात तसेच वृत्तवाहिनी माध्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना ‘आश्वासक पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी.डी. पाटील यांच्या हस्ते, ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सरमारंभ पार पडणार आहे, अशी माहिती विश्वस्त अंकुश काकडे (Ankush Kakade) आणि डॉ. सतीश देसाई (Dr Satish Desai) यांनी दिली.

कार्यक्रमात सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पदविकेच्या विद्यार्थ्यांना पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
अंतिम परीक्षेत आणि चालू घडामोडी विषयात प्रथम आलेल्या आनंद पोफळे यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार अनिल टाकळकर, सत्यजित जोशी आणि प्रतिभा चंद्रन यांची पुरस्कार्थींसाठी निवड समिती नेण्यात आली होती.
तर समन्वयक म्हणून जयराम देसाई (Jayram Desai) यांनी काम पाहिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात