Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात

पुणे : Ajit Pawar NCP MLA | अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांनी मावळ लोकसभेचे महायुतीचे (Maval Lok Sabha) उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांच्या प्रचारसभेत केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. शेळके यांनी महायुतीच्या टिकण्यावरच अप्रत्यक्षरित्या शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या या विधानावरून बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात. तसेच विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

आमदार सुनील शेळके यांनी बारणेंच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता. आता अजितदादांच्या आदेशामुळे ते बारणेंच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. मावळमधील प्रचारसभेत सुनील शेळके यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसमोर शेळके यांनी म्हटले की, लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र या दरम्यान महायुती टिकून राहावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

महायुतीकडून (Mahayuti) बारणेंचा प्रचार योग्य रित्या सुरु आहे का? याबाबत ही शेळकेंनी प्रश्न उपस्थित केले. तसेच मला ढकलून देण्याचे नियोजन करणाऱ्यांच्या खाली मी पण सुरुंग लावून ठेवला आहे, असे म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपला देखील सुनावले.

सुनील शेळके म्हणाले, माझ्या आमदारकीच्या काळात मी जे भोगले, ते पुढच्या पंचवीस वर्षात कोणाला अनुभवता येणार नाही.
गेल्या पाच वर्षातील फोडाफोडीचे राजकारण आपल्याला पटले नाही.

सुरूवातीला सुनील शेळके यांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारी विरोध केला होता.
परंतु, बारणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अजित पवारांच्या आदेशनंतर सुनील शेळके बारणेंच्या प्रचारात सक्रिय झाले.

शेळके यांनी म्हटले होते की, आमचे सर्वेसर्वा अजित पवार आहेत. त्यांनी जी भूमिका घेतली आहे.
त्या भूमिकेसोबत आम्ही ठामपणाने उभे आहोत. मात्र महायुतीचा धर्म हा फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाळावा, असे नाही.
शिवसेना (Shivsena), भाजप (BJP) यांनीदेखील युतीचा धर्म पाळला पाहिजे.
हा धर्म पाळत असताना वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळून एकत्र काम केले पाहिजे.

मात्र, बारणेंच्या प्रचारसभेत सहभागी होऊन सुनील शेळके यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे गोंधळ उडाला आहे. अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjog Waghere On Shrirang Barne | संजोग वाघेरेंनी सोडले बारणेंवर टीकास्त्र, ”दहा वर्षात
एकही प्रकल्प नाही, कामगार, पर्यटन, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले…”

Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray | पुण्यात मनसे नेते अमित ठाकरेंच्या भेटीनंतर
मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘आत्मविश्वास आणखी वाढला, विजय अधिक सोप्पा झाला’ (Videos)

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली