Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

पुणे : Shirur Lok Sabha | आजपासून पुणे (Pune Lok Sabha), मावळ (Maval Lok Sabha), शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी शिरूरसाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शरद पवार यांच्यासह मविआचे प्रमुख नेते उपस्थित होते.

अमोल कोल्हे यांनी आज पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल केला. कोल्हे यांनी आपला अर्ज शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याकडे सुपूर्द केला. (Shirur Lok Sabha)

यावेळी त्यांच्यासोबत खासदार व बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule), काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam), अशोक पवार (MLA Ashok Pawar), संजय जगताप (MLA Sanjay Jagtap), सचिन अहिर (Sachin Ahir), माजी आमदार उल्हास पवार (Ulhas Pawar) आदी उपस्थित होते.

अमोल कोल्हे यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत देखील आघाडी घेतली असून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर त्यांनी भर दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjog Waghere On Shrirang Barne | संजोग वाघेरेंनी सोडले बारणेंवर टीकास्त्र, ”दहा वर्षात
एकही प्रकल्प नाही, कामगार, पर्यटन, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले…”

Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray | पुण्यात मनसे नेते अमित ठाकरेंच्या भेटीनंतर
मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘आत्मविश्वास आणखी वाढला, विजय अधिक सोप्पा झाला’ (Videos)

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली