Vasai Crime News | ‘मरने दे साले को’ म्हणत कारचालकाने वाहतूक पोलिसाला दीड किलोमीटर फरफटत नेलं

वसई : पोलीसनामा ऑनलाइन – Vasai Crime News | वाहतूक नियमांचे उल्लंघन (Violation of Traffic Rules) करणाऱ्या कारचालकाला थांबण्यास सांगितले असता त्याने वाहतूक पोलिसाला (Traffic Police) दीड किलोमीटर फरफटत नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना वसईमध्ये (Vasai Crime News) घडली आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात (Manikpur Police Station) कारचालकासह त्याच्या मित्रावर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. सावेश सिद्धीकी (Savesh Siddhiki) असे अटक केलेल्या कारचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईमध्ये एका कारचालकाने सिग्नल तोडल्याने वाहतूक पोलिसाने त्याला थांबण्यास सांगितले. मात्र, कारचालकाने कार थांबवण्याऐवजी वाहतूक पोलिसाला जवळपास दीड किलोमीटर कारसोबत फरफटत (Dragged) नेले. ही घटना रविवारी सायंकाळी वसईच्या वसंत नगरी सिग्नल जवळ घडली. याबाबत पोलीस हवालदार सोमनाथ चौधरी (Police Constable Somnath Chaudhary) यांनी फिर्याद दिली आहे. (Vasai Crime News)

नेमकं काय घडलं?

पोलीस हवालदार सोमनाथ चौधरी हे रविवारी सायंकाळी वसंत नगरी सिग्नल जवळ कर्तव्य बजावत होते.
त्यावेळी सर्कलवर रेड सिग्नल असताना एक कारचालक सिग्नल तोडून पुढे आला.
त्यावेळी चौधरी यांनी त्याला हाताने कार बाजूला घेण्यास सांगितले. मात्र कारचालकाने कार पुढे नेत थेट चौधरी यांच्या अंगावर घातली. चौधरी यांनी प्रसंगावधान दाखवत कारच्या बोनेटवर चढले आणि गाडीच्या काचेच्या मधल्या जागेत पकडले.

त्यानंतर त्यांनी पुन्हा कारचालकाला थांबण्यास सांगितले. परंतु कारचालकाने कार न थांबवता तशीच पुढे गोखिवराच्या दिशेने नेली. वसई रेंज नाका येथे इतर गाड्या पुढे आल्याने कारचालकाने कार थांबवली.
मात्र, त्यावेळी दीड किलोमीटरच्या अंतरापर्यंत चौधरी यांना कारच्या बोनेटवरुन फरफटत नेले.
त्यावेळी चालक भरधाव वेगात कार चालवत होता.

वाहतूक पोलीस कारच्या बोनेटवर असल्याचे पाहून इतर वाहनचालकांनी कार थांबवण्यास सांगितले.
मात्र कारचालक ‘मरने दो साले को’ अशी आरेरावीची भाषा करत होता.
या घटनेनंतर चालक सावेश सिद्धीकी व त्याचा मित्र प्रितम चव्हाण या दोघांवर आयपीसी 353, 307,
308 नुसार गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.
आरोपी सावेश हा 19 वर्षाचा असून त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title :- Vasai Crime News | driver dragged traffic police on car bonnet for one and half km in vasai palghar maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Double Murder Case | पुण्यातील दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकललं, आईवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी UPSC करणाऱ्याने दाम्पत्याला संपवलं

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला केवळ खुर्च्यांची गर्दी’, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Ajit Pawar | आपल्याला बदला घ्यायचा आहे, पोटनिवडणूकीच्या जाहीर सभेत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी