Vasai Crime | वसई किनाऱ्यावर आढळला आणखी एका तरुणीचा मृतदेह; परिसरात खळबळ; आठवड्याभरातील दुसरी घटना

वसई : पोलीसनामा ऑनलाइन – Vasai Crime | भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर शिर नसलेल्या एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच अर्नाळा (Arnala) परिसरातील नवापूर समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी दुपारी एका अज्ञात तरुणीचा मृतदेह (dead body) आढळला आहे. आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने परिसरात (Vasai Crime) खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार संबंधित तरुणी 25 ते 30 वयोगटातील असून तिचा मृत्यू 18 ते 24 तासांपूर्वीच झाला असावा. मृत तरुणीच्या हाताच्या मनगटाला एक जखम आढळून आली आहे. त्यामुळे संबंधित तरुणीनं आत्महत्या केली कि तिची हत्या करून मृतदेह (dead body) समुद्रात टाकला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. सध्या या मृत तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

गेल्या आठवड्यात वसईजवळील भुईगाव (Bhuigaon) समुद्र किनारी एक सुटकेस आढळली होती. त्यामध्ये शिर नसलेल्या तरुणीचा मृतदेह असल्याचे समोर आले होते. संबंधित तरुणी नेमकी कोण? आणि तिची हत्या कोणी केली? याचा अद्याप उलगडा झाली नाही. तोपर्यंतच वसईमध्ये आणखी एक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे या दोन्ही तरुणींच्या मृत्यू (Death of two young women) प्रकरणाचा उलगडा करण्याचा आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, वसई परिसरातील वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्या जवळ जुलै महिन्यात पाच वेगवेगळे मृतदेह आढळले आहेत. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात देखील मृत्यू सत्र कायम आहे. याप्रकरणी पुढील तपास अर्नाळा पोलीस (Arnala Police) आणि गुन्हे शाखा करत आहेत.

Web Title :  Vasai Crime | young woman dead body found at vasai coast area crime in vasai virar

Pune News | गणेश बिडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून सभागृह नेते पद रद्द करा;
नगरसेविका पल्लवी जावळे यांची मागणी (VIDEO)

Modi Government । मोदी सरकारचा मोठा निर्णय !
‘या’ वाहनांसाठी नोंदणी शुल्क आणि RC शुल्क माफ

Crime News | मेहुण्याच्या प्रवेशासाठी डॉक्टरची तब्बल 4 लाख रुपयाची फसवणूक

Aadhaar Card चे enrollment status ‘या’ पध्दतीनं तपासा,
जाणून घ्या ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस

Paytm सारख्या वॉलेटमधून सुद्धा खरेदी करू शकता ‘इश्यू’,
SEBI ने दिली परवानगी

Maharashtra Police | हातात रिव्हॉलवर घेऊन व्हिडीओ बनवणं
पोलीस कर्मचाऱ्याला पडलं महागात; तडकाफडकी निलंबन (व्हिडीओ)

Pune Bhusar Market | पुण्याच्या भुसार बाजारात आता 5 ठिकाणी ‘पे अँड पार्क’