Vasant More Meet VBA Chief Prakash Ambedkar | वसंत मोरेंची राजगृहावर प्रकाश आंबेडकरांशी चर्चा, म्हणाले ”पुण्यातून शंभर टक्के लोकसभा लढणार” (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- Vasant More Meet VBA Chief Prakash Ambedkar | पुणे लोकसभा निवडणुक लढवण्यास इच्छूक असलेले वसंत मोरे यांनी आज मुंबईत प्रकाश आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीत पुण्यातून लढण्याबाबत चर्चा झाल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. मी शंभर टक्के पुण्यातून लोकसभा निवडणूक (Pune Lok Sabha Election 2024) लढणार असल्याचे मोरे म्हणाले. पण कोणत्या पक्षाकडून अथवा अपक्ष, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. तर प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत ३१ मार्चपर्यंत अंतिम निर्णय होईल, असे म्हटले आहे.

मनसेतून (MNS) बाहेर पडलेले आणि पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेले वसंत मोरे यांनी उमेदवारीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे चाचपणी केली, पण महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आता रवींद्र धंगेकर हे मराठा समाज (Maratha Samaj) आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा मिळवून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठीच आज वसंत मोरे यांनी राजगृह येथे वंचित पक्षाचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.(Vasant More Meet VBA Chief Prakash Ambedkar)

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक अपक्ष मराठा उमेदवार उतरवण्याचा निर्णय झाला आहे, त्यानुसार मराठा समाजाच्या सर्वत्र बैठका सुरू आहेत. या संदर्भातील पुण्यात झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीला इच्छूक उमेदवार वसंत मोरे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपण उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीची उमेदवार यादी जाहीर करताना, मनोज जरांगे पाटील व ओबीसी महासंघाचे प्रकाश शेंडगे यांच्यासोबत चर्चा करून पुढील उमेदवार जाहीर करणार असल्याचे प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले आहे. तसेच नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे सांगितले. वंचितने कोल्हापुरात शाहु छत्रपती यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे.

पहिल्या टप्प्यातील वंचितच्या उमेदवारांना मनोज जरांगे यांचे समर्थन आहे. याबाबत त्यांच्यासोबत चर्चा झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यानंतर आज वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे.

या भेटीनंतर वसंत मोरे म्हणाले की, मी शंभर टक्के पुणे लोकसभेची निवडणूक लढणार आहे. मी माझे नशीब समजतो की, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी मला येथे बोलावले. मला त्यांनी पुरेसा वेळ दिला, त्यातून आमची अतिशय चांगली चर्चा झाली.

वसंत मोरे म्हणाले, पुण्यातील मतदान चौथ्या टप्प्यात होणार आहे, त्यामुळे आमच्याकडे खूप वेळ आहे.
पुढील काही दिवसांत कोणता मार्ग स्वीकारायचा याबाबत निर्णय घेऊ.
पुणे लोकसभेसाठी वंचितचा उमेदवार द्यायचा की नाही याचा निर्णय प्रकाश आंबेडकर घेतील.

तर प्रकाश आंबेडकर म्हणाले, वसंत मोरे यांच्याबरोबर आमची चर्चा आज झाली.
अधिकृत निर्णय ३१ मार्च पर्यंत आम्ही जाहीर करू. महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल,
ती कोण कोण करणार आहे. हे अधिकृतरित्या काही दिवसांतच सर्वांसमोर मांडू. काही चर्चा आताच जाहीर करू शकत नाही.
मी नवीन राजकीय समीकरण मांडू इच्छित आहे, असे संकेत प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Nilesh Lanke | नगरमध्ये राजकीय हालचालींना वेग, निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, बोलावली तातडीची सभा

Pune Court News | पुणे : पार्किंगच्या वादातून खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला जामीन मंजूर

Mumbai To Pune Cabs | मुंबई ते नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार, जाणून घ्या नवे दर

Vasant More-Prakash Ambedkar | वसंत मोरे उमेदवारीसाठी आता प्रकाश आंबेडकरांना भेटणार? जरांगे-आंबेडकर-शेंडगे समीकरणातून ठरू शकतात ‘गेम चेंजर’

Bachchu Kadu Targets Navneet Rana | बच्चू कडू वर्ध्यातून निवडणूक लढवणार? ३०० कार्यकर्त्यांनी रक्तदानाद्वारे केली मागणी, नवनीत राणांबद्दल म्हणाले…

Pune Kothrud Crime | पुणे : कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी, आयटी इंजिनिअरवर गुन्हा दाखल