Vasant More Meets Sharad Pawar | पुण्यात वसंत मोरेंनी घेतली शरद पवारांची भेट, राष्ट्रवादीत प्रवेशाची हालचाल, म्हणाले…

पुणे : Vasant More Meets Sharad Pawar | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Lok Sabha) इच्छूक असलेले आणि मनसेला (MNS) नुकताच रामराम केलेले नेते वसंत मोरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पुणे कार्यालयात शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही महत्वाच्या मुद्द्यावर मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचे या भेटीनंतर सांगितले.

वसंत मोरे यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि खासदार अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) उपस्थित होते. या भेटीनंतर वसंत मोरे म्हणाले, पुणे लोकसभा मतदारसंघाची सध्याची स्थिती काय आहे, याबाबत मी शरद पवारसाहेबांना माहिती दिली. त्यांना सर्व परिस्थिती माहीत आहे.

ते म्हणाले, मी उभा राहिल्यास कसा निवडून येऊ शकतो, याबाबतची माहिती मी त्यांना दिली.
तसेच जयंत पाटील यांनी काही गोष्टी लेखी स्वरुपात मागवल्या होत्या. त्या मी आज दिल्या आहेत.

वसंत मोरे यांची ही प्रतिक्रिया पाहता, येत्या काही दिवसात ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करतील,
अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या वतीने रूपाली पाटी यांनी देखील त्यांना पक्षात
येण्याची ऑफर दिली होती. तसेच पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी वसंत मोरे यांची भेट घेऊन
काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gyanesh Kumar- IAS Sukhbir Singh Sandhu | ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंह संधू नवे केंद्रीय निवडणूक आयुक्त, पंतप्रधान समितीकडून निवड

Pune Police MCOCA Action | वारजे माळवाडी परिसरातील गणेश उर्फ गुड्या पटेकर टोळीवर ‘मोक्का’! चालु वर्षातील पुणे पोलिसांची 16 वी कारवाई

Jayant Patil On Modi Ki Guarantee | ‘मोदी की गॅरंटी’वर जयंत पाटील यांची बोचरी टीका, ”चले तो चांद तक, नही तो शाम तक”

Former President Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती स्थिर, उद्या घरी सोडणार