Vastu Tips : ‘या’ दिशांना चुकूनही ठेवू नका औषधे, आरोग्यावर होतो परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vastu Tips Related to Medicines : जीवनाचा भरपूर आनंद घेण्यासाठी व्यक्तीचे शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. सामान्यपणे लोक वास्तुनुसार घरात योग्य दिशेला सामान तर ठेवतात परंतु छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. अशावेळी वास्तु दोष उत्पन्न झाल्याने अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

वास्तु शास्त्रानुसार औषधे ठेवण्याच्या ठिकाणाचाही व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. घरात काही ठिकाणे अशी सुद्धा असतात, जिथे औषधे ठेवल्याने नकारात्मक परिणाम पहायला मिळतात.

वास्तुनुसार जाणुन घ्या घरात औषधे ठेवण्याची योग्य जागा कोणती असावी—-

* वास्तुनुसार उत्तर दिशा आणि उत्तर-पूर्वमध्ये औषधे ठेवणे योग्य मानले जाते. औषधे योग्य प्रकारे ठेवली गेल्यास व्यक्ती लवकर बरा होण्याची शक्यता वाढते आणि रोगांपासून लवकर सुटका होते. तर दक्षिण-पूर्व आणि दक्षिण दिशेला औषधे कधीही ठेवू नयेत.

* वास्तुनुसार, जर घरात दक्षिण दिशेला औषधे ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या-छोट्या आजारात सुद्धा औषधे घेणे योग्य समजतात. यासाठी दक्षिण दिशेला औषधे ठेवू नये.

* अनेकदा किचन म्हणजे स्वयंपाक घरात काम करताना छोट्या प्रमाणात कापणे, जळण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी स्वयंपाक घरात लोक फर्स्ट एड बॉक्स किंवा औषधांचा डबा ठेवतात परंतु वास्तुनुसार स्वयंपाक घरात कधीही औषधांचा डबा ठेवू नये. व्यक्तीच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो.

* दक्षिण-पूर्व दिशेला औषधे ठेवू नयेत. असे मानले जाते की, या दिशेला औषधे ठेवल्याने याचा परिणाम कमी होतो. ज्यामुळे नियमित घेऊन सुद्धा रूग्णाला आजारातून बरे होण्यास वेळ लागतो.