पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन

पिंपरी चिंचवड मध्ये तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. थेरगावमध्ये वीस ते पंचवीस वाहनांना समाजकंटकांनी लक्ष केले आहे. दहशत पसरवून नेहमी पसार होणाऱ्या टवाळखोरांपैकी एक मात्र यावेळी नागरिकांच्या हाती लागला.त्याला चोप देऊन वाकड पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ही घटना रात्री साडेबाराच्या सुमारास थेरगाव येथे घडली आहे.या समाजकंटकांनी हातात कोयते घेऊन गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत.

धनगरबाबा मंदिर,नखाते नगर,नम्रता हौसिंग सोसायटी येथील गाड्यांची तोडफोड

याप्रकरणी महेश मुरलीधर तारू (४३, रा.नखाते नगर) यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एम-एच १४ ए-एफ ४६०१ या दुचाकीवरून आरडाओरडा करत हातात कोयते घेऊन तीन अज्ञात समाजकंटकांनी गाड्यांची तोडफोड केली यात चारचाकी आणि दुचाकीचा समावेश आहे.

धनगरबाबा मंदिर,नखाते नगर,नम्रता हौसिंग सोसायटी येथील गाड्यांची तोडफोड केली.गाड्यांचे नुकसान आणि त्यातच दहशत यामुळं पिंपरी चिंचवडकर पुरते हैराण झालेत. अन पोलीस या घटना रोखण्यात सपशेल अपयशी ठरत आहेत.अश्यातच संतप्त नागरिकांनी यावेळी एका समाजकंटकांचा पाठलाग केला अन एकाला पकडून चांगलाच चोप दिला. इतर पसार झाले असून पोलिसांनी आता पकडून दिलेल्याची कसून चौकशी करावी आणि सर्वांना धडा शिकवावा, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे.यातील फिर्यादी यांनी तोडफोड करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांना अडवण्याचा प्रयन्त केला परंतु त्यांनाच कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील एक हजार रुपये काढून घेतले.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.