१ सप्टेंबरपासून वाहनांना थर्डपार्टी विमा बंधनकारक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

 नवीन चारचाकी व दुचाकी वाहन खरेदी करणे आता महाग होणार आहे. कारण १ सप्टेंबरपासून चारचाकी वाहनांना एकाच वेळी तीन वर्षांचा तर दुचाकीसाठी एकच वेळी पाचवर्षांचा थर्डपार्टी विमा काढणे बंधनकारक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने थर्डपार्टी विमा बंधनकारक करण्याचे आदेश दिले आहेत.

या विम्याला लाँगटर्म थर्डपार्टी प्रीमियम असे नाव देण्यात आले आहे. या विम्याशिवाय कोणताही ग्राहक गाडी खरेदी करू शकणार नाही. भारतीय विमा प्राधिकारण आणि विकास प्राधिकारणानेही हा आदेश जारी केला आहे. ग्राहकाला लाँगटर्म थर्डपार्टी विमा देण्यात यावा असे या आदेशात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर थर्डपार्टी विमा बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B01DDP7D6W,B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dc17aa07-acd5-11e8-a158-8f67e341c961′]

खासगी कारसाठी १ हजार सीसीसाठी थर्डपार्टी विम्याकरता ग्राहकांना ५२८६ रूपये, १ हजार सीसीपेक्षा जास्त आणि १५०० सीसी पर्यंतच्य कारसाठी ९५३४ रूपये आणि १५०० सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या कारसाठी २४३०५ रूपये या विम्यासाठी भरावे लागणार आहेत. हा विमा तीन वर्षांचा असणार आहे. तर दुचाकींसाठी ७५ सीसीकरिता १०४५ रूपये, ७५ सीसीपेक्षा जास्त आणि १५० सीसीपर्यंत ३२८५ रूपये आणि ३५० सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्य दुचाकीसाठी १३०३४ रूपये या थर्डपार्टी विम्यासाठी भरावे लागणार आहेत.

१ सप्टेंबरपासून हा विमा बंधनकारक होणार आहे. यासंदर्भातील आदेशात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, यामुळे अपघातातील पीडितांना नुकसान भरपाई मिळू शकेल. विमा कंपन्यांनी याकडे व्यावसायिक हित म्हणून न पाहता मानवीय हित म्हणून पहावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की, भारतात दरवर्षी रस्ते अपघातात लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागातात.